Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या त्या वक्तव्यावरून नाभिक समाजात पडले 2 गट

Last Updated:

छगन भुजबळ यांनी नगरमध्ये सभा घेऊन मनोज जरंगे पाटील यांच्यावर टीका करत न्हावी समाजाने मराठा समाजाच्या दाढ्या करू नये असे वक्तव्य केले होते.

छगन भुजबळ
छगन भुजबळ
हरिष दिमोठे, अहमदनगर : मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील आक्रमक आहेत तर ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये म्हणून मंत्री छगन भुजबळ हे आक्रमक आहेत. छगन भुजबळ यांनी नगरमध्ये सभा घेऊन मनोज जरंगे पाटील यांच्यावर टीका करत न्हावी समाजाने मराठा समाजाच्या दाढ्या करू नये असे वक्तव्य केले होते. यानंतर नाभिक समाजात दोन गट पडले आहेत. काहींनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेचे समर्थन केलं आहे तर काहींनी विरोध केला आहे. छगन भुजबळ यांच्या भाषणानंतर ग्रामीण भागातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.
छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यानंतर ग्रामीण भागातील नाभिक समाज आणि मराठा समाज यांच्यामध्ये द्वेष निर्माण होत आहे. छगन भुजबळ हे फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी आणि केलेल्या पाप धुण्यासाठी समाजाचा वापर करत असल्याचा आरोप मराठा संघटनांनी केला आहे. मात्र यावर नाभिक समाजाच्या कार्यकर्त्यांनी सावध भूमिका घेत त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. नाभिक नाभिक समाज हा त्यांच्या पाठीशी उभा असून यापुढेही त्यांच्या मागे उभा राहणार असल्याचं स्थानिक नेत्यांनी सांगितलं.
advertisement
ओबीसी मधून आरक्षण द्या नंतर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेत एल्गार मिळावे सुरू केले आहेत. मात्र या मेळाव्यात सर्व समाजाचे नेते उपस्थित राहत आहेत. तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जरांगे पाटील हे एकटेच सध्या नेतृत्व करत आहेत. दोन्ही नेत्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे स्थानिक गाव पातळीवर समाजासमजात तेढ निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली जातेय.
advertisement
नाभिक समाजाबाबत केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भुजबळांच्या या वक्तव्याविरोधात नाभिक समाज आक्रमक झाला आहे, तसंच भुजबळांनी माफी मागावी, अन्यथा राज्यभरात निषेध करू, असा इशाराही नाभिक समाजाकडून दोन दिवसांपूर्वीच देण्यात आला आहे. ‘राज्यातील न्हावी समाजाने मराठा समाजातील लोकांची हजामत करू नये,’ असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं होतं, यावर नाभिक समाजाने आक्षेप नोंदवला होता.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या त्या वक्तव्यावरून नाभिक समाजात पडले 2 गट
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement