Ahmednagar News: बसमध्ये जागेवरून झाला वाद, कॉलेजसमोर विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
अहमदनगर शहरातील मध्यवर्ती ठिकाण आणि भरवस्तीत घडलेल्या या प्रकाराने कॉलेजमधील विद्यार्थी घाबरले आहेत.
साहेबराव कोकणे, अहमदनगर, 02 ऑगस्ट : अहमदनगरमध्ये एका तरुणावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडलीय. न्यू आर्ट्स कॉलेज महाविद्यालयासमोर घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. यात महाविद्यालयीन तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र या घटनेने शहरात भीतीचे वातावरण आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, न्यू आर्ट्स कॉलेज महाविद्यालयासमोर एका तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत युवराज गुंजाळ हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अहमदनगरमधील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील मध्यवर्ती ठिकाण आणि भरवस्तीत घडलेल्या या प्रकाराने कॉलेजमधील विद्यार्थी घाबरले आहेत.
advertisement
दरम्यान, ही घटना समजताज तोफखाना पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोर पसार झाले असून ते कोण होते याबाबत पोलीस तपास करीत आहे. ही घटना शहर वाहतूक बस मध्ये सीटवर बसण्याच्या कारणातून वाद झाल्यानंतर हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 02, 2023 3:26 PM IST
मराठी बातम्या/अहमदनगर/
Ahmednagar News: बसमध्ये जागेवरून झाला वाद, कॉलेजसमोर विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला










