Parbhani Election Result: ठाकरे गटाचा भगवा अखेर फडकला, पालिकेत शिंदे गटाला चारली धूळ!

Last Updated:

या निवडणुकीत ठाकरे गटाने महाविकास आघाडीचा धर्म पाळला. इथं ठाकरे गट आणि काँग्रेसने आघाडी केली होती.

News18
News18
परभणी :  महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. जवळपास बऱ्याच महापालिकेचे निकाल हे स्पष्ट झाले आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाा मुंबईत सत्ता गमवावी लागली आहे. राज्यातील अनेक पालिकांमध्येही ठाकरेंना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पण, जगात जर्मनी भारतात परभणी असं म्हणवलं जाणाऱ्या परभणीमध्ये ठाकरेंची सत्ता येणार असं चित्र आहे. ठाकरे गटाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहे.
परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणी सुरू आहे.  एकूण ६५ जागांसाठी निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाने महाविकास आघाडीचा धर्म पाळला. इथं ठाकरे गट आणि काँग्रेसने आघाडी केली होती. दोन्ही गटाने एकत्र निवडणूक लढवली. ठाकरे गटाला इथं सर्वाधिक १८ जागा जिंकल्या आहे. तर काँग्रेसने १२ जागा जिंकल्या आहेत. ठाकरे गट आणि काँग्रेसने ३० जागांवर विजय मिळवला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी फक्त २ जागांची गरज आहे.
advertisement
परभणी महापालिका निवडणूक निकाल
भाजप - 12
शिवसेना शिंदे - 0
राष्ट्रवादी ( AP ) - 10
शिवसेना ( UBT ) - 18
काँग्रेस - 12
अपक्ष - 4
ठाकरे गटाच्या विजयाचं गणित काय? 
विशेष म्हणजे, परभणीमध्ये खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली  महाविकास आघाडीने आक्रमक असा प्रकार केला होता. दोन्ही नेत्यांच्या प्रचारामुळे महाविकास आघाडीला इथं विजय मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला. परभणी हा तसा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला समजला जात होता. पण मागील काही वर्षांपासून काँग्रेसने इथं आपली पकड मजबूत केली. त्यामुळे काँग्रेस-ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट-भाजप अशी लढत होती. पण महायुतीमध्ये इथं बिघाडी झाली होती. भाजप आणि शिवसेनेनं अनेक जागांवर स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. त्यामुळे त्याचा फटका हा मतविभाजनात झाला.
advertisement
तर अजित पवार गटाने सुद्धा परभणीमध्ये शरद पवार गटासोबत आघाडी केली होती. पण, या आघाडीला परभणीकरांनी नाकारलं, इथं पवार गटाला भोपळाही फोडता आला नाही.
तर दुसरीकडे, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने सुद्धा अनेक ठिकाणी मुस्लिम बहुल भाग आणि दलित भागात आपले उमेदवार उभे केले होते. पण, याचा परिणाम मोठ्या विजयात झाला नाही.
advertisement
 मागील पालिका निकालात काय झालं? 
परभणी पालिका निवडणूक २०१७ मध्ये काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकून सत्ता स्थापन केली होती. काँग्रेसने तेव्हा ३१ जागा जिंकल्याा होत्या. रााष्ट्रवादी काँग्रेसने १८ आणि भाजपने ८ जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेनं ६ जागा जिंकल्या होत्या.  पण, यावेळी निकाल हा पूर्णपणे फिरला आहे. ठाकरे गटाने इथं सर्वाधिक १८ जागा जिंकून मोठा भाऊ असल्याचं दाखवून दिलं आहे.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Parbhani Election Result: ठाकरे गटाचा भगवा अखेर फडकला, पालिकेत शिंदे गटाला चारली धूळ!
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement