जालन्यात भगवा फडकला, पहिला महापौर भाजपचा होणार, अंतिम निकाल काय लागला? संपूर्ण यादी
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Jalna Mahanagar Palika Final Result 2026: जालना महानगर पालिका निवडणुकीत भाजपला प्रचंड मोठं यश मिळालं आहे. जालना महानगर पालिकेवर पहिल्यांच भाजपचा भगवा झेंडा फडकला आहे.
रवी जैस्वाल, प्रतिनिधी जालना: जालना महानगर पालिका निवडणुकीत भाजपला प्रचंड मोठं यश मिळालं आहे. जालना महानगर पालिकेवर पहिल्यांच भाजपचा भगवा झेंडा फडकला आहे. जालन्याला महानगर पालिकेचा दर्जा मिळाल्यापासून ही पहिलीच निवडणूक होती. पहिल्याच निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत भाजपनं विजय खेचून आणला. कधी काळी जालना हा काँग्रेसचा गड मानला जात होता. पण यंदा हा गड ढासळला आहे. जालन्यात भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे.
जालना महानगर पालिकेचा अंतिम निकाल
जालना महानगर पालिकेत भाजपनं ६५ पैकी ४१ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याने इथला पहिला महापौर हा भाजपचा होणार आहे. भाजपनंतर इथं शिवसेना शिंदे गटाचे १२ नगर सेवक निवडून आले आहेत. तर काँग्रेसला केवळ 9 जागांवर विजय मिळवता आला. दोन जागांवर एमआयएमने बाजी मारली आहे. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.
advertisement
जालन्यात भाजप नेते कैलास गोरंट्याल, रावसाहेब दानवे, आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कैलास गोरंट्याल यांची पत्नी संगिता गोरंट्याल, मुलगा अक्षय गोरंट्याल, रावसाहेब दानवे यांचा भाऊ भास्कर दानवे, भावजय सुशीला दानवे आणि अर्जुन खोतकर यांची कन्या दर्शना झोल हेही निवडणुकीच्या रिंगणात होते. सर्वच नेत्यांनी प्रतिष्ठा राखत कुटुंबातील सदस्य निवडून आणले आहेत.
advertisement
जालना महानगर पालिकेतील विजयी उमेदवारांची यादी
प्रभाग क्रमांक १
भदनेकर कल्याण जगदीश, (भाजप)
ज्योति रवी सले. (भाजप)
दानवे सुशीला भास्करराव. (भाजप)
पदमा अजीत मानधानी (भाजप)
दानवे भास्करराव मुकुंदराव (भाजप)
प्रभाग क्रमांक 2
2 A: श्रध्दा दिपक साळवे – भाजप विजयी
2 B: पुजा योगेश भगत – शिवसेना विजयी
2 C: दिपक रविशंकर राठोड – शिवसेना विजयी
advertisement
2 D: मजहर समर सय्यद – भाजप विजयी
प्रभाग क्रमांक 3 : विजयी उमेदवार
3 A: भगवान चादोंडे – भाजप विजयी
3 B: ऐश्वर्या आडेकर – भाजप विजयी
3 C: कपिल भुरेवाल – भाजप विजयी
3 D: पुनम स्वामी – भाजप विजयी
प्रभाग क्रमांक 4 विजयी मध्ये भाजप चे 3 आणि काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी...
advertisement
1) कुरिल रुपा संजय भाजप
2)फारुख सादिक तुंडीवाले काँग्रेस
3)सखुबाई गुलाबराव पानबिसरे भाजप
4)संजय प्रभाकर पाखरे भाजप
प्रभाग क्रमांक 5 : विजयी उमेदवार
5 A: अक्षय गोरंट्याल – भाजप विजयी
5 B: अनिता खोडवे – भाजप विजयी
5 C: माया जोशी – भाजप विजयी
5 D: अजय भरतीया – भाजप विजयी
advertisement
प्रभाग क्रमांक 6 विजयी उमेदवार.
गोरंट्याल संगिता कैलास. (भाजप)
प्रियंका रोहित भुरेवाल (भाजप)
विरेन्द्रकुमार अमरचंद धोका (भाजप)
संतोष गंगाराम माधोवाले (भाजप)
प्रभाग क्रमांक (७)विजयी उमेदवार
अ).कमलेश जगदिश खरे - शिवसेना
ब).पार्वताबाई महादेव देशमाने. - भाजप
क).स्नेहलता कामड - भाजप
ड).राजेश राऊत - भाजप
प्रभाग ८ मधील विजेते उमेदवार
अ- पूजा दिनेश भगत - शिवसेना
advertisement
ब - वर्षा वैजनाथ राऊत - भाजप
क. रमेश गौरक्षक - भाजप
ड - दुर्गेश कठोठीवाले शिवसेना
प्रभाग क्रमांक 9 : विजयी उमेदवार.
9 A: मंगल गरदास – भाजप विजयी
9 B: संध्या देठे – भाजप विजयी
9 C: महावीर ढक्का– भाजप विजयी
9 D: विक्रांत ढक्का – भाजप विजयी
प्रभाग क्रमांक (10)विजयी उमेदवार
अ).आसिफ अन्सारी - काँग्रेस
ब).अन्सारी फरहाना अब्दुल रऊफ. - कांग्रेस
क).इंगळे कार्तिका मनोज भाजप
ड)अमजत खान नवाब खान कांग्रेस
प्रभाग क्रमांक 11 विजयी उमेदवार.
इम्रान खान अमानुल्ला खान - काँग्रेस
अब्दुलसगीर अजीज शेख - शिवसेना
सायरा फकरुल्लाह खान - (AIMIM)
खान नगमाबी फेरोज खान -(AIMIM)
प्रभाग क्रमांक 12
सुनिल अशोक बोर्डे (अ) काँग्रेस
सौ. मयुरी दिनेश दैने (ब) काँग्रेस
रुबिणा मजिद पठाण (क) काँग्रेस
अनिल अशोक तिरुखे (ड) काँग्रेस
प्रभाग 13: विजयी उमेदवार
1. भाग्यश्री जोगस: विजयी भाजप
2. महेश निकम: विजयी भाजप
3. पांगारकर: विजयी भाजप
4. श्रीकांत पांगारकर: विजयी अपक्ष
प्रभाग क्रमांक 14 : विजयी उमेदवार
14 A: ॲड. सीमा खरात – भाजप विजयी
14 B: अशोक पांगारकर – भाजप विजयी
14 C: सुलोचना गोर्डे – भाजप विजयी
14 D: शशिकांत घुगे – भाजप विजयी
प्रभाग क्रमांक 15 विजयी उमेदवार
संजय पंढरीनाथ डुकरे , (शिवसेना)
सत्यभामा विजय जाधव (शिवसेना)
अशोक मगनराव पवार (भाजप)
वंदना अरुण मगरे (भाजप)
प्रभाग क्रमांक १६ : विजयी उमेदवार
A: निखिल रमेश पगारे – शिवसेना विजयी
B: उषाबाई अशोक पांगारकर – शिवसेना विजयी
C: दर्शना विजय झोल – शिवसेना विजयी
D: अमोल प्रदिप सिंह ठाकूर – शिवसेना विजयी
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 4:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जालन्यात भगवा फडकला, पहिला महापौर भाजपचा होणार, अंतिम निकाल काय लागला? संपूर्ण यादी










