Newasa News : गुढीपाडव्याला हादरावून टाकणारी घटना, मांजरीमुळे एकाच कुटुंबातील 5 जण बुडाले, Video समोर
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Newasa News : नेवासा तालुक्यात बायोगॅसच्या खड्ड्यात एकापाठोपाठ सहाजण बुडाल्याची घटना घडली आहे.
अहमदनगर, (हरीष दिमोटे, प्रतिनिधी) : राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह सुरू असताना एकसारख्याच दोन घटनांनी महाराष्ट्र हादरलं आहे. पहिली घटना विरार पश्चिमेकडील रुस्तुम जी शाळेच्या बाजूला सेफ्टी टँकची सफाई सुरू असताना घडली. या टँकमध्ये 4 कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता अहमदनगर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे.
मांजरीला वाचवताना सहाजण बायोगॅसच्या खड्ड्यात बुडाले होते. नेवासा तालुक्यातील वाकडी येथे ही घटना घडली. बायोगॅसच्या खड्ड्यात पडलेल्या मांजरीला वाचवण्यासाठी एकजण उतरला तो बुडत असताना इतरांनी वाचवण्याच्या प्रयत्नात सर्वजण बुडाले. यामध्ये नागरीकांना एकाला बाहेर काढण्यात यश मिळालं आहे. जखमीवर नेवासा येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेवासा तालुक्यातील वाकडी येथील एका बायोगॅसच्या विहीरीत एक मांजर पडली. या मांजरीला वाचवण्यासाठी एकजण खाली उतरला. यात चक्कर एकजण बुडाला. त्यानंतर एका पाठोपाठ सहाजण बुडाल्याची घटना घडली. बायोगॅसचा खड्डा शेणाने भरलेला होता. घटनेनंतर पोलीस आणि तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. शेणाने भरलेल्या विहीरीत अजूनही पाचजण बुडालेले आहेत. यातील एक जणाला बाहेर काढण्यात यश मिळालं आहे.
advertisement
नेवासा तालुक्यात बायोगॅसच्या खड्ड्यात एकापाठोपाठ सहाजण बुडाले#newasa #ahmednagar pic.twitter.com/TJnKpFJ1Av
— News18Lokmat (@News18lokmat) April 9, 2024
बुडालेल्या लोकांची माहिती
१. माणिक गोविंद काळे
२. संदीप माणिक काळे
३. बबलू अनिल काळे
४. अनिल बापूराव काळे
५. बाबासाहेब गायकवाड
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Apr 09, 2024 7:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Newasa News : गुढीपाडव्याला हादरावून टाकणारी घटना, मांजरीमुळे एकाच कुटुंबातील 5 जण बुडाले, Video समोर







