Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाला इंदोरीकर महाराजांचा पाठिंबा, घेतला मोठा निर्णय
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला किर्तनकार निवृत्त इंदोरीकर महाराज यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
अहमदनगर, (हरिष दिमोटे, प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील लाखोंचा मोर्चा घेऊन मुंबईच्या वेशीवर आले आहेत. काहीच तासांमध्ये हा मोर्चा मुंबईत दाखल होऊ शकतो. दिवसेंदिवस या मोर्चात लाखो मराठा बांधव सहभागी होत आहे. मराठा आरक्षणाला आता प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी पाठिंबा दर्शवला आहे. यासाठी त्यांनी पुढील तीन दिवसांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
पुढील 3 दिवस सर्व कार्यक्रम रद्द
याआधी काही चित्रपट कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढाऱ्यांनी मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा दिला होता. आता प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी पाठिंबा दर्शवला आहे. यासाठी त्यांनी पुढील 3 दिवस सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. 26, 27 व 28 जानेवारी रोजी होणारे सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. मागील आंदोलनाच्या वेळी सुद्धा 5 दिवस कार्यक्रम स्थगित केले होते. इंदोरीकर महाराज यांचे सहाय्यक किरण महाराज शेटे यांनी ही माहिती दिली.
advertisement
जरांगे पाटलांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाल परवानगी नाही
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईत विविध वित्तीय संस्था, आंतरराष्ट्रीय वकिलाती व इतर वित्तीय केंद्रे कार्यरत आहेत. मुंबईत अंदाजे दररोज 60 ते 65 लाख नागरिक हे नोकरी निमित्ताने ट्रेन व इतर वाहतुकीच्या माध्यमाने प्रवास करत असतात. सकल मराठा समाज आंदोलक हे प्रचंड मोठ्या वाहन संख्येसह मुंबईत आल्यास त्याचा विपरीत परिणाम होईल आणि मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडणार आहे.
advertisement
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदानाचे 7000 स्क्वेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे. त्याची क्षमता 5 ते 6 हजार आंदोलकांना सामावून घेण्याची आहे. तिथे प्रचंड मोठ्या संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी मैदानात मुबलक जागा उपलब्ध होणार नाही. परिणामी, त्यांना त्या प्रमाणात सोईसुविधाही मिळणार नाहीत. तेथील उर्वरित मैदान क्रीडा विभागाच्या अख्यत्यारित असून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्रमांक मैदान 3024/प्र.क. 12/2024/कीयुसे-1, दि. 24.01.2024 अन्वये तेथे आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Jan 25, 2024 7:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाला इंदोरीकर महाराजांचा पाठिंबा, घेतला मोठा निर्णय







