Video : ...अन् इंदोरीकर महाराजांच्या घरात शिरला बिबट्या; कुत्र्यालाही नेलं उचलून
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांचं संगमनेर तालुक्यातील ओझर गावात घर आहे. या घरात चक्क बिबट्या घुसल्याची घटना घडली आहे.
अहमदनगर, 10 ऑक्टोबर, हरीष दिमोटे : इंदोरीकर महाराज कायम चर्चेत असतात. त्यांच्या किर्तनाची शैली सर्वांनाच भुरळ घालते. त्यांच्या किर्तनालाही प्रचंड गर्दी होते. आता पुन्हा एकदा इंदोरीकर महाराज चर्चेत आले आहेत. मात्र कारण वेगळ आहे. ते म्हणजे इंदोरीकर महाराजांच्या राहत्या घरात चक्क बिबट्या शिरल्याची घटना घडली आहे. बिबट्यानं तिथे असलेल्या एका कुत्र्याला देखील उचलून नेलं आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांचं संगमनेर तालुक्यातील ओझर गावात घर आहे. या घरात चक्क बिबट्या घुसल्याची घटना घडली आहे. बिबट्यानं तिथे झोपलेलं एक कुत्रं देखील उचलून नेलं आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता दोन कुत्रे झोपलेले आहेत. तेवढ्यात तिथे अचानक बिबट्या येतो, त्यापैकी एका कुत्र्यावर तो हल्ला करतो आणि त्याला आपल्या सोबत घेऊन जातो.
advertisement
इंदोरीकर महाराजांच्या राहत्या घरात चक्क बिबट्या शिरल्याची घटना घडली आहे. बिबट्यानं तिथे असलेल्या एका कुत्र्याला देखील उचलून नेलं आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. pic.twitter.com/7UCr28181m
— News18Lokmat (@News18lokmat) October 10, 2023
ग्रामस्थांमध्ये दहशत
view commentsगेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. परिसरात बिबट्याचा वावर असल्यानं ग्रामस्थ दहशतीमध्ये आहेत. या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.
Location :
Ahmadnagar,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
October 10, 2023 11:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Video : ...अन् इंदोरीकर महाराजांच्या घरात शिरला बिबट्या; कुत्र्यालाही नेलं उचलून


