'तुम्ही आमच्या बहिणी, पण असं कात्रीत पकडणं म्हणजे..'; अजितदादा अंगणवाडी सेविकांना नेमकं काय म्हणाले?
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
उपमुख्यमंत्री अजित पवार हे श्रीगोंदा दौऱ्यावर आले असता अंगणवाडी सेविकांनी त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं आहे.
अहमदनगर, साहेबराव कोकणे, प्रतिनिधी : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला आहे. याचा मोठा फटका हा लहान बालकांना बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हे श्रीगोंदा दौऱ्यावर आले असता अंगणवाडी सेविकांनी त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं.
अंगणवाडी सेविकांनी अजित पवार यांना निवेदन दिलं, आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी विनंती त्यांनी या निवेदनाच्या माध्यमातून केली, यावर बोलताना अजित पवार म्हणाले राज्यातील अनेक निवेदनं मला भेटली आहेत. पैसे वाढले पाहिजेत यात दुमत नाही, परंतु तुम्ही आम्हाला असं कात्रीत पकडू नका, पैसे द्या नाहीतर आम्ही येणार नाही हे बरोबर नाही शेवटी तुम्हीही आमच्याच घरच्या बहिणी आहात. काही पेमेंट वाटले आहे, उर्वरीत पेमेंट लवकरच अदा केले जाईल असं आश्वासन अजित पवार यांनी अंगणवाडी सेविकांना दिलं आहे.
advertisement
दरम्यान अंगणवाडी सेविका आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून संपावर आहेत. याचा मोठा फटका हा ग्रामीण भागातील माता आणि बालकांना बसत असल्याचं दिसून येत आहे. अजित पवार यांनी देखील आता त्यांना संप मागे घ्यावा असं आवाहन केलं आहे.
Location :
Ahmadnagar,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
January 20, 2024 12:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
'तुम्ही आमच्या बहिणी, पण असं कात्रीत पकडणं म्हणजे..'; अजितदादा अंगणवाडी सेविकांना नेमकं काय म्हणाले?


