Ahmednagar : कर्जवसुलीसाठी बॅंकेने छळलं, ‘त्याने’ आयुष्यच संपवलं; वसंत मोरेंच्या नावे लिहिली चिठ्ठी
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
मृतदेहाजवळ पोलिसांना एक चिठ्ठीही सापडली. त्यात बँक कर्मचाऱ्यांकडून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा उल्लेख आहे.
अहमदनगर, 16 डिसेंबर : अहमदनगर तालुक्यात एका व्यक्तीने खासगी बँकेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृतदेहाजवळ पोलिसांना एक चिठ्ठीही सापडली. त्यात बँक कर्मचाऱ्यांकडून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा उल्लेख आहे. या चिठ्ठीत मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळं सर्वच हैराण झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मोहन आत्माराम रक्ताटे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मोहन यांनी खासगी बँकेतून कर्ज घेऊन माल वाहू टेम्पो घेतला होता. मात्र, दोन आठवडे कर्ज थकीत असल्याने संबंधित बँकेने आपला टेम्पो जमा केला आणि परस्पर विकला. कोणतीही सूचना न देता बॅंकेने टेम्पो विकल्यानं आणि त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्यानं मोहन यांनी 10 डिसेंबर 2023 ला विष प्राशन करून आत्महत्या केली.
advertisement
पोलिसांना मृतदेहाजवळ चिठ्ठी सापडली होती. हे चिठ्ठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या नावाने होती. माझे दोन हफ्ते थकल्यानं संबंधित बॅंकेने माजा टेम्पो जमा करून कोणतीही नोटीस न पाठवता परस्पर विकाला. वसंत मोरेच मला न्याय मिळवून देतील, असं चिठ्ठीत लिहिलं आहे.
या घटनेची माहिती मिळताच वसंत मोरेंनी रक्ताटे यांच्या कुटुंबाची भेट घेतली. खासगी बँकेच्या जाचाल कंटाळून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मोरे यांनी केली. जर गुन्हे दाखल झाले नाही तर मनसे स्टाईल हिसका दाखवण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 16, 2023 12:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Ahmednagar : कर्जवसुलीसाठी बॅंकेने छळलं, ‘त्याने’ आयुष्यच संपवलं; वसंत मोरेंच्या नावे लिहिली चिठ्ठी


