माथेफिरू दिरानं आपल्याच दोन भावजयांना संपवलं, हातात कोयता घेऊन गावभर फिरला, अहमदनगर हादरलं

Last Updated:

अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका माथेफिरू दिराने आपल्या दोन भावजयांची कोयत्यानं वार करून हत्या केली आहे.

News18
News18
अहमदनगर, हरीष दिमोटे, प्रतिनिधी : अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका माथेफिरू दिराने आपल्या दोन भावजयांची कोयत्यानं वार करून हत्या केली आहे. या घटनेनंतर आरोपी हा हातात कोयता घेऊन गावात फिरताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
ही घटना अकोले तालुक्यातील बेलापूर गावात घडली आहे. पैशांच्या किरकोळ वादातून दिरानेच आपल्या दोन भावजयांची कोयत्यानं वार करून हत्या केली आहे. आरोपी दीर गावातून हातात कोयता घेऊन फिरताना सिसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेने अकोले तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी गावात सोमवारी भर दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरोपी दत्तात्रय प्रकाश फापाळे याने किरकोळ पैशाच्या वादातून उज्वला अशोक फापाळे आणि वैशाली संदीप फापाळे यांची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच अकोले पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना या दोघीही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. आरोपी घटनस्थळावरून फरार झाला असून, आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
माथेफिरू दिरानं आपल्याच दोन भावजयांना संपवलं, हातात कोयता घेऊन गावभर फिरला, अहमदनगर हादरलं
Next Article
advertisement
Nanded Crime News : 'तुझं लग्न लावून देतो',  आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

View All
advertisement