अहमदनगर-कल्याण महामार्गावर एसटी बस आणि ऊसाच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
ठाणे-मेहकर एसटी बस, उसाचा ट्रॅक्टर आणि इको गाडीची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, सहा जणांचा मृत्यू झाला आहे
साहेबराव कोकणे, अहमदनगर : अहमदनगर- कल्याण महामार्गावर एसटी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला असून यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. ढवळापूर फाट्यानजीक एसटी बस, इको गाडी आणि उसाच्या ट्रॅक्टरचा विचित्र अपघात झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ठाणे-मेहकर एसटी बस, उसाचा ट्रॅक्टर आणि इको गाडीची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी ५ जणांचा मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात तर एकाचा अहमदनगर इथं उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर पलटी झाला होता, ट्रॅक्टर बाजूला काढत असताना भरदाव वेगाने आलेल्या एसटी बसने इको गाडी आणि ट्रॅक्टर उडविले या अपघातामध्ये एसटी बस चालकासहा ट्रॅक्टर काढण्यासाठी मदत करणारे नागरिक यांच्यासह सहा जण ठार झाले आहे.
advertisement
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत झाली आहे. अपघातग्रस्तांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 24, 2024 7:48 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
अहमदनगर-कल्याण महामार्गावर एसटी बस आणि ऊसाच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू


