मोठी बातमी! ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का, पक्षात घडामोडींना वेग

Last Updated:

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

News18
News18
अहमदनगर, साहेबराव कोकणे, प्रतिनिधी : जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रावादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कर्जत- जामखेड विधानसभाप्रमुख मधुकर राळेभात यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर आरोप केले आहेत. राळेभात यांनी रोहित पवारांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत- जामखेड विधानसभाप्रमुख मधुकर राळेभात यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर आरोप केले आहेत. 'विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचा आदर ठेवून आम्ही जामखेडच्या जनतेने एका स्थानिक कॅबिनेट मंत्र्याना पराभूत केले. रोहित पवार यांना निवडून आणले. कर्जत- जामखेड मतदार संघात जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाच्या फलकांवर प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष किंवा अन्य पदाधिकाऱ्यांचे नाव किंवा फोटो लावले जात नाहीत.
advertisement
मतदारसंघात २५ ते ३० वर्षापासून ज्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र पक्षासाठी काम केले. त्यांचाही सन्मान राखला जात नाही. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यक्रमात जेष्ठ कार्यकर्त्यांना मत मांडण्याचा अधिकार दिला जात नाही. या सर्व गोष्टींना कंटाळून आम्ही आमच्या सर्व पदांचा राजीनामा देवून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून बाहेर पडत आहोत,' असं मधुकर राळेभात यांनी म्हटलं आहे. दरम्यान मधुकर राळेभात यांचा राजीनामा हा कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
मोठी बातमी! ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का, पक्षात घडामोडींना वेग
Next Article
advertisement
Nanded Crime News : 'तुझं लग्न लावून देतो',  आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

View All
advertisement