'मला मतदारसंघात अडकवण्यासाठी...'; रोहित पवारांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
अहमदनगर, प्रतिनिधी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू आहे, मला मतदारसंघामध्ये अडकवण्यासाठी राज्यातील मोठे नेते मैदानात उतरले आहेत असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मला मतदारसंघात अडकवण्यासाठी राज्यातील मोठमोठे नेते कामाला लागले असून, त्यांना उत्तर याच मतदारसंघातील जनता देईल असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये आज निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मिळून स्वाभिमान यात्रा काढली आहे यावेळी ते बोलत होते.
advertisement
पुढे बोलताना ते म्हणाले की, ही संकल्पना कार्यकर्त्यांची असून त्याचा मी आदर करतो, ही स्वाभिमान यात्रा कर्जत जामखेड मतदारसंघातील प्रत्येक गावा गावात जाणार असून त्या ठिकाणी शिक्षण स्वच्छता आणि पाच वर्षात केलेल्या कामांची माहिती ग्रामस्थांना सांगणार आहे. या यात्रेला श्री शेत्र सिद्धिविनायक मंदिर येथून सुरुवात करण्यात आली आहे, ही निवडणूक जरा वेगळी असून महान व्यक्तींच्या विरोधात यावेळी लढत होणार आहे, त्यांच्यामागे राज्यसह केंद्राची ही ताकद उभी राहणार आहे. तर माझ्या वतीने ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हाती घेतली असून त्यांच्याच बळावर येणाऱ्या काळात मी निवडणूक लढवणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
Location :
Ahmadnagar,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Sep 07, 2024 12:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
'मला मतदारसंघात अडकवण्यासाठी...'; रोहित पवारांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल







