onion price : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, कांद्याचे भाव वाढले; गृहिणींचं बजेट कोलमडणार?

Last Updated:

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे काद्यांच्या भावात वाढ होताना दिसत आहे. निर्यातबंदी उठवल्याचा फायदा झाला आहे.

News18
News18
अहमदनगर, साहेबराव कोकणे प्रतिनिधी : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे काद्यांच्या भावात वाढ होताना दिसत आहे. निर्यात बंदी केल्यानंतर कांद्याचे दर गडगडले होते, काद्यांच्या विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नसल्यानं बळीराजा हवालदिल झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा निर्यात बंदी उठवल्यानंतर काद्यांच्या दरात वाढ होताना दिसत आहे. काद्यांच्या दरात वाढ होत असल्यानं त्याचा फायदा हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति कीलो एकवीस रुपये भाव मिळाला आहे. तर प्रति क्विंटल 2100 रुपये एवढा भाव मिळाला आहे, उपबाजार समितीमध्ये 53219 एवढ्या गोण्याची आवक झाली. कांद्याला भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. 2100 भाव मिळाला असता तरी यातून थोडाफार खर्च तरी मिळतो.  त्यामुळे सरकारने निर्यातबंदी करू नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
advertisement
दरम्यान निर्यातबंदी उठवल्यानंतर कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे  गृहिणीचं बजेट मात्र कोलमडू शकतं. सध्या काद्याला 21 रुपये किलो एवढा भाव मिळत आहे.  भविष्यात कांद्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
onion price : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, कांद्याचे भाव वाढले; गृहिणींचं बजेट कोलमडणार?
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement