आंदोलनाला विरोध नाही पण 'ती' मागणी चुकीची, जरांगेंच्या सभेवर विखे पाटील स्पष्टच बोलले
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
आज जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची विराट सभा झाली. या सभेवर भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अहमदनगर, 14 ऑक्टोबर, हरिष दिमोटे : मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणासाठी 40 दिवसांचा वेळ दिला आहे. त्याला आज तीस दिवस पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये सभा घेतली, या सभेला लाखोंच्या संख्येनं मराठा समाज उपस्थित होता. सभेत बोलताना जरांगे यांनी सरकारला 24 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. यावर आता भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले विखे पाटील?
ओबीसीमधून आरक्षण द्या, ही जरांगे यांची मागणी चुकीची आहे, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण ही पहिल्या लढ्यापासूनची मागणी आहे. आमचा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला विरोध नाही. मात्र ओबीसीमधून आरक्षण मागणं योग्य नाही, निजाम काळातील कुणबी दाखले मिळत असतील तर हरकत नाही. मात्र कुणाच्या आरक्षणात आम्हाला वाटा नको ही भूमिका हवी असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
advertisement
पुढे बोलताना त्यांनी मराठा समाज्याच्या आरक्षणावरून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला देखील टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना न्यायालयात आरक्षण टीकलं होतं. मात्र मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण गेले असा टोला विखे पाटील यांनी लगावला आहे.
काय आहे जरांगे पाटलांची मागणी?
view commentsआजच्या सभेमध्ये बोलताना जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. एक म्हणजे मराठा समाजाला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देऊन त्यांचा समावेश हा ओबीसी समाजामध्ये करावा. अन्यथा मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण द्यावं, मात्र ते टिकणारं असावं पन्नास टक्क्यांच्या वर असू नये, तर आम्ही त्याचा स्विकार करू असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
Location :
Ahmadnagar,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
October 14, 2023 2:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
आंदोलनाला विरोध नाही पण 'ती' मागणी चुकीची, जरांगेंच्या सभेवर विखे पाटील स्पष्टच बोलले


