'आता आम्ही..', भुजबळांच्या राजीनाम्याच्या गौप्यस्फोटानंतर पडळकर आक्रमक, सांगितला पुढचा प्लॅन

Last Updated:

भुजबळ यांच्या राजीनाम्याच्या गौप्यस्फोटानंतर आता भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी देखील ओबीसी आरक्षणावर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

News18
News18
अहमदनगर, साहेबराव कोकणे, प्रतिनिधी : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून वातावरण  तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आता ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे.  शनिवारी ओबीसी समाजाचा (OBC) महाएल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘सरकार आणि विरोधी पक्षातील लोक राजीनामा द्या म्हणत आहेत. मी असं भाषण करतो म्हणून सरकारमधून काढून टाका अशी मागणी करत आहे. मला लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा असंही म्हणतात. पण मी 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा  दिला आहे. अडीच महिने शांत आहे. मला लाथ घालायची गरज नाही. ओबीसीसाठी लढत राहणार’ असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
भुजबळ यांच्या गौप्यस्फोटानंतर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी देखील आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसीच्या आरक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न सध्या राज्यात सुरू आहे, मात्र ओबीसीमध्ये आता जागृती झाली आहे. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु गावागावात ओबीसी जागृत झाला आहे. त्यामुळे धमकवण्याचा प्रयत्न करू नये, राज्य सरकारने ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबत कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नये, अन्यथा महाराष्ट्रातील ओबीसी सर्व ताकतीने याचा विरोध करेल. आम्ही सर्व ओबीसी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन लढा देणार आहेत. असा इशारा यावेळी आमदार गोपीचंद पडळक यांनी दिला आहे.
advertisement
भुजबळांच्या राजीनाम्यावर फडणवीसांचा खुलासा 
दरम्यान भुजबळ यांच्या राजीनाम्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गडचिरोलीमध्ये आले असता फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. भुजबळांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच अधिक विस्तारानं सांगू शकतील, पण मुख्यमंत्र्यांनी किंवा मी त्यांचा राजीनामा स्विकारलेला नाही, असा खुलासा फडणवीस यांनी भुजबळांच्या राजीनाम्यावर केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
'आता आम्ही..', भुजबळांच्या राजीनाम्याच्या गौप्यस्फोटानंतर पडळकर आक्रमक, सांगितला पुढचा प्लॅन
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement