Crime News : चाकूचा धाक दाखवून तरुणांचा वस्तीगृहातील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, अहमदनगर हादरलं

Last Updated:

अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

News18
News18
अहमदनगर, 16 डिसेंबर, साहेबराव कोकणे : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील एका वस्तीगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर दोन तरुणांनी चाकूचा धाक दाखवून आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला आहे. या प्रकरणात पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, या दोन अल्पवयीन मुली जिल्ह्यातील एका महाविद्यालयातील वस्तीगृहात शिक्षणासाठी राहत आहेत. पीडित मुलींवर दोन तरुणांनी चाकूचा धाक दाखवून आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केला. या प्रकरणी पीडित मुलींच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या प्रकरणात पीडितेच्या मैत्रिणीनेच या दोन आरोपींची ओळख त्यांच्याशी करून दिली होती. या प्रकरणात तिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Crime News : चाकूचा धाक दाखवून तरुणांचा वस्तीगृहातील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, अहमदनगर हादरलं
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement