Ahmednagar Crime : अनैसर्गिक अत्याचाराला विरोध केला म्हणून खून, अहमदनगर हादरलं, दोघांना उत्तर प्रदेशातून अटक
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.
अहमदनगर, साहेबराव कोकणे, प्रतिनिधी : अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. अनैसर्गिक कृत्य करण्यास विरोध केल्यानं एकाची हत्या करण्यात आली आहे. नायलॉन दोरीच्या मदतीनं गळा आवळला, त्यानंतर पीडित व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अनैसर्गिक कृत्य करण्यासाठी पीडित व्यक्तीला दारू पाजली. मात्र त्याने विरोध केल्याने नायलॉन दोरीच्या सहाय्याने त्याचा गळा आवळून आणि डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हत्येच्या आरोपावरून दोघांना उत्तर प्रदेशमधील अग्रा येथून अटक केली आहे. विशाल जगताप आणि साहिल पठाण असं या प्रकरणातील आरोपींची नावं आहेत.
advertisement
अहमदनगर एमआयडीसीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अनैसर्गिक अत्याचार करण्यासाठी आरोपींनी पीडित व्यक्तीला आधी दारू पाजली. त्यानंतर त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने विरोध केला. याचा राग आल्यानं आरोपी विशाल जगताप आणि साहिल पठाण या दोघांनी त्याचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळला, त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली.
advertisement
आरोपींनी हत्येनंतर मृतदेह सह्याद्री कंपनीच्या परिसरात टाकून, घटनास्थळावरून पोबारा केला. या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी विशाल जगताप आणि साहिल पठाण यांना उत्तर प्रदेशमधील अग्रा येथून अटक केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Location :
Ahmadnagar,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Feb 27, 2024 9:33 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Ahmednagar Crime : अनैसर्गिक अत्याचाराला विरोध केला म्हणून खून, अहमदनगर हादरलं, दोघांना उत्तर प्रदेशातून अटक







