बायको सरपंच तर नवरा उपसरपंच, जाणून घ्या, असं कोणत्या गावात घडलं?
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
एकाच कुटुंबातील अनेक जण राजकारणात असण्याची ही परंपरा काही नवीन नाही.
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी
अहमदनगर, 25 नोव्हेंबर : राज्यात नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यानंतर आता सरपंच निवडीची प्रक्रियाही झाली. अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. संसाराचा गाडा हा पती पत्नी चालवतात. पण एका गावाचा कारभारही पत्नी आणि पतीकडेच आल्याचं पाहायला मिळालं आहे. नेमकं हे गाव कोणतं, त्या ठिकाणी नेमकं काय घडलं, हे जाणून घेऊयात.
advertisement
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव गुप्ता येथेही निवडणूक झाली. येथे जनतेतून सरपंचपदी सोनूबाई शेवाळे यांची बिनविरोध निवड झाली होती. तर त्यानंतर झालेल्या निवडणुकीत सोनूबाई शेवाळे यांचे पती विजय शेवाळे यांचे पॅनल निवडून आले. त्यामध्ये विजय शेवाळे यांची सर्व सहमतीने उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे.

advertisement
त्यामुळे ज्याप्रमाणे संसाराचा गाडा पती पत्नी चालवतात, ज्याप्रमाणे या वडगाव गुप्ता गावाचाही गाडा हे पत्नी-पत्नी चालवणार आहेत. सरपंच सोनुबाई शेवाळे आणि उपसरपंच विजय शेवाळे हे दोघे पती-पत्नी 35 वर्ष संसाराचा गाडा चालल्यानंतर आज गावकऱ्यांनी त्यांच्या हातात गावाची धुरा दिली आहे.
एकाच कुटुंबातील अनेक जण राजकारणात असण्याची ही परंपरा काही नवीन नाही. विधानसभा असेल लोकसभा असेल, इतकंच नव्हे तर नगरपालिकेतही एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त जण प्रतिनिधित्व करताना दिसतात. यानंतर आता वडगाव गुप्ता या गावाच्या सरपंचपदी पत्नी तर उपसरपंचपदी पतीची निवड झाल्यानंतर गावाचा गाडा हे दाम्पत्य कसा चालवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Nov 25, 2023 9:37 AM IST







