Ajit Pawar Manikrao Kokate: अजितदादांनी फोन फिरवला, माणिकराव कोकाटेंचं काय ठरलं? आज मोठ्या घडामोडीची शक्यता...

Last Updated:

Ajit Pawar : माणिकराव कोकाटेंच्या कथित ऑनलाइन रमीच्या डावात सूरज चव्हाण यांचा गेम झाला. तर, आता पक्षविरोधी वातावरण शांत करण्यासाठी अजित पवारांनी डॅमेज कंट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

अजितदादांनी फोन फिरवला, माणिकराव कोकाटेंचं काय ठरलं? आज मोठ्या घडामोडीची शक्यता...
अजितदादांनी फोन फिरवला, माणिकराव कोकाटेंचं काय ठरलं? आज मोठ्या घडामोडीची शक्यता...
मुंबई : माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात बसून रमी खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. माणिकराव कोकाटेंच्या कथित ऑनलाइन रमीच्या डावात सूरज चव्हाण यांचा गेम झाला. तर, आता पक्षविरोधी वातावरण शांत करण्यासाठी अजित पवारांनी डॅमेज कंट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आज वाढदिवसाच्या दिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रिटर्न गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.
माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात बसून रमी खेळतानाची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. लातूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवदेन देण्यासाठी गेलेले छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि इतरांनी मारहाण केली. त्यानंतर राज्यात संताप उसळल्यानंतर चव्हाण यांचा राजीनामा घेण्यात आला.

अजितदादांचा फोन?

advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली. त्यानंतर आज माणिकराव कोकाटे आज माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

कोकाटेंची आज पत्रकार परिषद...

आज मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सिन्नर येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत काही निर्णय जाहीर करतात की आपल्यावरील आरोपाच्या अनुषंगाने पु्न्हा स्पष्टीकरण देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
advertisement

मुख्यमंत्री फडणवीसांनी कृषिमंत्र्यांचे कान टोचले

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात बसून रमी खेळतानाची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत कृषिमंत्र्यांचे वर्तन सरकारला भूषणावह नाही, असे म्हटले.
विधान भवनात ज्यावेळी चर्चा चालते त्यावेळी कामजाकात अतिशय गांभीर्याने सहभागी होणे अपेक्षित असते. तसेच जरी आपल्या विभागाचे कामकाज नसले तरीही गांभीर्याने ऐकणे गरजेचे असते. एखादवेळी आपण कागदपत्रे वगैरे चाळू शकतो. पण सभागृहात बसून रमी खेळणे हे सरकारला अजिबात भूषणावह नसल्याचे मुख्यमंत्र्‍यांनी म्हटले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar Manikrao Kokate: अजितदादांनी फोन फिरवला, माणिकराव कोकाटेंचं काय ठरलं? आज मोठ्या घडामोडीची शक्यता...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement