अमित शाहांच्या बैठकीआधी पुन्हा संशयाचं धुकं, एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर अजित पवारांचं मोठं वक्तव्य

Last Updated:

अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर बोलताना भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याला शिंदे यांचा 'अप्रत्यक्ष' पाठिंबा आहे, असे विधान केल्याने अमित शाहांसोबतच्या बैठकीआधी पुन्हा संशयाचं धुकं तयार झाले.

एकनाथ शिंदे आणि अजित पवार
एकनाथ शिंदे आणि अजित पवार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेली अडीच वर्षे मला खूप उत्तम सहकार्य केले. युतीचे सरकार बनविताना पहाडासारखे तुमच्यामागे उभे राहू, असे त्यांनी सांगितले होते. त्यांनी आम्हाला दिलेला शब्द पाळला. मला राज्यातील गोरगरिब महिला, युवकांसाठी काम करता आले. माझ्या कामावर मी समाधानी आहे. पदासाठी माझा संघर्ष कधीच नव्हता. आता मोदी-शाह पुढचा निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, अशी भूमिका स्पष्ट करून मुख्यमंत्रिपदावरील दावा एकनाथ शिंदे यांनी सोडला तसेच मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतून माघार घेत असल्याचे त्यांनी अप्रत्यक्ष सांगितले. मात्र गुरुवारी अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर बोलताना भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याला शिंदे यांचा 'अप्रत्यक्ष' पाठिंबा आहे, असे विधान केल्याने अमित शाहांसोबतच्या बैठकीआधी पुन्हा संशयाचे धुके तयार झाले.
महायुतीला भरघोस यश मिल्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या अंतिम निर्णयासाठी भाजपचे महाराष्ट्राचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार तसेच शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे गुरुवारी (आज) राजधानी दिल्लीत आहेत. आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी तिघांचीही चर्चा होणार आहे. चर्चेअंती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नवी दिल्लीतील कार्यालयात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत आणि शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
advertisement

एकनाथ शिंदे यांचा भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी अप्रत्यक्ष पाठिंबा, अजित पवार यांचे विधान

राज्यातील मुख्यमंत्रिपदाच्या तिढ्यावर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत आमची बैठक आहे. आजच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदासंदर्भात चर्चा होईल तसेच इतरही सत्तावाटपाच्या समीकरणांवर चर्चा होईल. आम्ही तर भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याला आधीच पाठिंबा दिलेला आहे. काल एकनाथ शिंदे यांनीही अप्रत्यक्ष पाठिंबा दिलेला आहे, असे अजित पवार म्हणाले. याचाच अर्थ अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत थेट भाजपचाच मुख्यमंत्री होईल आणि तो कोण असेल? या मुद्द्यापासून चर्चेला सुरुवात होणार असून शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देण्यासंदर्भात कोणतीही चर्चा होणार नाही, असा छुपा अर्थ अजित पवार यांच्या बोलण्यातून व्यतित होतो.
advertisement

अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेअंती मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होईल

अमित शाह यांच्याशी आज रात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि माझी चर्चा होईल. या चर्चेत मुख्यमंत्रिपदाबरोबरच अनेक मुद्द्यांवर चर्चा होईल. चर्चेअंती मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अमित शाहांच्या बैठकीआधी पुन्हा संशयाचं धुकं, एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement