advertisement

Ajit Pawar : राष्ट्रवादीत घडामोडींना वेग,आमदारांना तातडीने मुंबईत बोलावलं, उद्या सकाळी होणार मोठा निर्णय

Last Updated:

अजित पवारांनंतर आता राष्ट्रवादीतून उपमुख्यमंत्री ठरवण्यासाठी उद्या शनिवारी 31 जानेवारी 2026 ला मुंबईत एक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत उप मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार,यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

ajit pawar death
ajit pawar death
Ajit Pawar News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आता पुढे राष्ट्रवादीतून उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोण सांभाळणार?यावरून सध्या राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांनंतर आता राष्ट्रवादीतून उपमुख्यमंत्री ठरवण्यासाठी उद्या शनिवारी 31 जानेवारी 2026 ला मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि संसदीय मंडळाची एक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत राष्ट्रवादीतून उप मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार,यावर शिक्कामोर्तब होणार आहे.त्यामुळे या घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कुणाकडे येणार? हा मोठा प्रश्न होता.याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वेगाने हालचाली सूरू झाल्या आहेत.त्यानुसार उद्या मुंबईत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे.या बैठकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची गटनेते पदी निवड होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर उप मुख्यमंत्री पदी सुनेत्रा पवार यांची सर्वानुमते निवड होण्याची शक्यता आहे.
advertisement
खरं तर या घडामोडींना तेव्हा वेग आला जेव्हा सुनेत्रा पवार यांच्याशी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी फोनवरून चर्चा केली. या चर्चेनंतर सुनेत्रा पवार यांच्याकडून सकारात्मक उत्तर आल्याची सुत्रांकडून माहिती मिळते आहे.त्यामुळे उपमुख्यमंत्री पदी सुनेत्रा पवार यांची निवड होणार आहे, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.फक्त आता औपचारीकता म्हणून मुंबईत शनिवारी बैठक होणार आहे.या बैठकीत सुनेत्रा पवार यांची उप मुख्यमंत्री पदी निवड होणार आहे? हे स्पष्ट होणार असल्याचे बोलले जात आहे.
advertisement
दरम्यान अजित पवार यांच्याकडे अनेक खाती होती. ही खाती नेमकी कुणाकडे जातील? यावर उद्या चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवारांजवळ असलेल्या खात्यांबाबत काय निर्णय होतो? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar : राष्ट्रवादीत घडामोडींना वेग,आमदारांना तातडीने मुंबईत बोलावलं, उद्या सकाळी होणार मोठा निर्णय
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement