भाजपला कसं खिंडीत गाठायचं? प्रचार कसा करायचा? पुण्यातील उमेदवारांना अजित पवार यांचा कानमंत्र
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Ajit Pawar Pune Mahapalika Election: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजीनगर येथील ‘तरवडे क्लार्क्स इन’ येथे महत्त्वाची बैठक पार पडली.
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेली पुणे महानगरपालिका हिसकावून घेण्यासाठी अजित पवार पुण्यात ठाण मांडून बसले आहेत. उमेदवारांशी थेटपणे बोलून भाजपविरोधात नेटाने कसा लढायचे, याचा कानमंत्र अजित पवार स्वत: देत आहेत. गेल्या काही वर्षांत आपण केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा, आपला प्रचार घरोघरी जाऊन करा, जनतेशी संपर्क ठेवा, अशा सूचना अजित पवार यांनी उमेदवारांना दिल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजीनगर येथील ‘तरवडे क्लार्क्स इन’ येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीस पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे सर्व उमेदवार उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी उपस्थित उमेदवारांशी संवाद साधत प्रत्येकाची भेट घेतली.
संघटनात्मक तयारी, प्रचाराची दिशा आणि स्थानिक मुद्द्यांवर मार्गदर्शन
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संघटनात्मक तयारी, प्रचाराची दिशा आणि स्थानिक मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. तसेच सर्वांनी एकत्रितपणे काम करून जनतेपर्यंत विकासाचे मुद्दे प्रभावीपणे पोहोचवावेत, असे आवाहन त्यांनी केले.
advertisement
पुढचे आठ-दहा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे, प्रचाराचे योग्य पद्धतीने नियोजन करा
आपण केलेली कामे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचा. तुम्ही येणाऱ्या वर्षांत प्रभागात काय कामे करणार आहेत, हे जनतेला समजावून सांगा. भाजपच्या सत्ताकाळात कोणती कामे झाली नाहीत, हे देखील जनतेला सांगा. राष्ट्रवादी पक्ष सत्तेत येणे का गरजेचे आहे, हे लोकांच्या मनावर ठसवा. तसेच पुढचे आठ-दहा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असल्याने प्रचाराचे योग्य पद्धतीने नियोजन करा, अशा सूचना अजित पवार यांनी उमेदवारांना दिल्या.
advertisement
अजित पवार यांच्याविरोधात भाजपचा आक्रमक प्रचार, राष्ट्रवादीचीही जशास तशी उत्तर देण्याची रणनीती
ही बैठक आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरली. उपस्थित उमेदवारांनी अजित पवार यांनी सांगितलेल्या सूचना ऐकून त्यांची मतेही बैठकीत मांडली. यावेळी अनेकांनी अजित पवार यांच्याविरोधात भाजपच्या आक्रमक प्रचाराची तक्रार करून जशास तसे उत्तर देण्याची तयारी असल्याचे सांगितले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 3:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपला कसं खिंडीत गाठायचं? प्रचार कसा करायचा? पुण्यातील उमेदवारांना अजित पवार यांचा कानमंत्र










