शेतात फवारणीची वेळ चुकवताय? थेट उत्पादनावर बसेल फटका, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Last Updated:

शेतीत कीड आणि रोग नियंत्रणासाठी फवारणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र फवारणीची योग्य वेळ चुकल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागू शकते. 

+
News18

News18

बीड : शेतीत कीड आणि रोग नियंत्रणासाठी फवारणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र फवारणीची योग्य वेळ चुकल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागू शकते. कृषी तज्ज्ञांच्या मते, पिकांच्या वाढीच्या ठराविक अवस्थेत आणि अनुकूल हवामानात फवारणी करणे आवश्यक असते. वेळेवर उपाय न केल्यास किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आणि त्याचा थेट फटका उत्पादनावर बसतो. याबद्दलच कृषी अभ्यासक महादेव बिक्कड यांनी माहिती दिली आहे
फवारणी उशिरा झाल्यास किडींची संख्या नियंत्रणाबाहेर जाते. या किडी पानांवर, फुलांवर आणि फळांवर हल्ला करून पिकांचे मोठे नुकसान करतात. परिणामी पानांची प्रकाशसंश्‍लेषण प्रक्रिया कमी होते, पिकांची वाढ खुंटते तसेच फुलगळ आणि फळगळ यांसारख्या समस्या उद्भवतात. अनेक वेळा शेतकऱ्यांना रोग नियंत्रणासाठी अधिक तीव्र औषधांचा वापर करावा लागतो, ज्यामुळे खर्च वाढतो.
advertisement
दुसरीकडे, वेळेआधी किंवा चुकीच्या टप्प्यावर फवारणी केल्यासही अपेक्षित परिणाम साधता येत नाही. पिकांना गरज नसताना केलेली फवारणी ही औषधांची नासाडी ठरते. विशेषतः दुपारच्या तीव्र उन्हात किंवा पावसाच्या आधी फवारणी केल्यास औषध झाडांवर टिकत नाही. त्यामुळे पिकांवर ताण येऊन पाने जळणे, फुले गळणे किंवा वाढ मंदावणे असे दुष्परिणाम दिसून येतात.
advertisement
फवारणीची योग्य वेळ चुकल्याने उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ होते. अपेक्षित नियंत्रण न झाल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा फवारणी करावी लागते. याचा थेट परिणाम नफ्यावर होतो. तसेच अयोग्य वेळेतील फवारणीमुळे जमिनीत आणि पर्यावरणात रासायनिक अवशेष वाढण्याची शक्यता निर्माण होते, जे दीर्घकालीन दृष्टीने घातक ठरू शकते.
कृषी विभाग आणि तज्ज्ञ शेतकऱ्यांना फवारणी करताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी, हवामान कोरडे आणि शांत असताना आणि पिकाच्या योग्य वाढीच्या अवस्थेत फवारणी करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे. योग्य वेळेवर आणि योग्य पद्धतीने केलेली फवारणी पिकांचे संरक्षण करते, उत्पादन वाढवते आणि शेतकऱ्यांचा खर्च कमी करून नफा वाढवण्यास मदत करते.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
शेतात फवारणीची वेळ चुकवताय? थेट उत्पादनावर बसेल फटका, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
Next Article
advertisement
Santosh Dhuri Attack Raj Thackeray: कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
  • मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला

  • संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल

  • राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटल

View All
advertisement