अजितदादांच्या शहराध्यक्षाचा पैसे मोजतानाचा Video बारामतीत व्हायरल, जय पाटलांनी आरोप फेटाळले

Last Updated:

बारामती नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार मोसिन पठाण यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष जय पाटलांचा पैशांच्या बॅगेसह पैसे मोजतानाचा व्हिडिओ व्हायरल केला आहे.

जय पाटील (राष्ट्रवादीचे बारामती अध्यक्ष)
जय पाटील (राष्ट्रवादीचे बारामती अध्यक्ष)
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी, बारामती: बारामती शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष जय पाटील यांचा पैशाच्या बॅगेसह पैसे मोजतानाचा कथित व्हिडीओ समाज माध्यमांत जोरदार व्हायरल होत आहे. मात्र संबंधित व्हिडीओ एआयने तयार केला असल्याचे सांगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आरोप फेटाळून लावले आहेत.
बारामती नगर परिषदेची निवडणूक २० जानेवारीला होत आहे. आज १८ तारखेला निवडणूक प्रचार थांबला. नेमका त्याच दिवशी व्हिडीओ व्हायरल झाल्याने तर्कवितर्क लढवले जात आहे. मात्र व्हायरल होत असलेला व्हिडीओ एआयने बनविल्याचा दावा शहराध्यक्ष जय पाटील यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर होत असल्याचा गंभीर आरोप केला होता. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी तो फेटाळून लावला होता. आता व्हायरल व्हिडीओनंतर अजित पवार यांच्या पक्षावर शरद पवार गटाकडून टीका करण्यात येत आहे.
advertisement

जय पाटलांचा पैशाच्या बॅगेसह पैसे मोजतानाचा व्हिडिओ व्हायरल

अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोसिन पठाण यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष जय पाटलांचा पैशाच्या बॅगेसह पैसे मोजतानाचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यानंतर बारामतीत खळबळ उडाली आहे.

तो व्हिडीओ एआयने बनविलेला, पोलिसांत तक्रार दाखल केलीये- जय पाटील

संबंधित व्हिडीओ एआयने बनविलेला असून मतदानाच्या आदल्या दिवशी विरोधकांनी खोडसाळपणा केला आहे. या व्हिडीओची तक्रार मी बारामती पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. मतदानाआधीच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असे सांगत आपल्यावरील आरोप जय पाटील यांनी फेटाळून लावले.
advertisement

अजित पवारांचा बारामतीत प्रचार, काय म्हणाले?

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेनं पुढे जात, बारामती शहरासोबतच ग्रामीण भागाचाही सर्वांगीण विकास करण्याचा आमचा संकल्प आहे. आतापर्यंत बारामतीमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक विकास साधता आला, याचा मला अभिमान आहे. शहरात फिरताना काम केल्याचं समाधान मिळतं, हीच आमच्या कार्याची पोचपावती आहे. बारामती आज विद्येचं माहेरघर म्हणून पुढं येत असून नवनवीन प्रशिक्षण केंद्रे, पायाभूत सुविधा, शिवसृष्टीसारखे प्रकल्प आणि नागरिककेंद्री विकासकामं वेगानं सुरू आहेत, अशा भावना या सभेच्या निमित्ताने अजित पवार यांनी व्यक्त केल्या. तसेच राष्ट्रवादीच्या उमेदवारांमागे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी बारामतीकरांना केले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांच्या शहराध्यक्षाचा पैसे मोजतानाचा Video बारामतीत व्हायरल, जय पाटलांनी आरोप फेटाळले
Next Article
advertisement
Satej Patil : सतेज पाटलांना विरोधी पक्षनेते पद मिळू नये धडपड? प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन
प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..
  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

View All
advertisement