पहिल्या पार्टमध्ये अक्षय खन्ना, मग पार्ट 2 मध्ये कोण असणार खरा 'धुरंधर'? 2026 मध्ये आणखीच भयानक होणार खेळ

Last Updated:
Know About Dhurandhar Part 2: सध्या सगळीकडे फक्त एकाच नावाची हवा आहे आणि ती म्हणजे 'धुरंधर'. पण पहिला भाग म्हणजे तर फक्त 'ट्रेलर' होता, खरा धमाका तर अजून बाकी आहे!
1/7
Ranveer Singh, Dhurandhar, Dhurandhar Part 2, Dhurandhar Box office collection, Dhurandhar Budget, Dhurandhar Part 2 Release Date, रणवीर सिंह, धुरंधर, धुरंधर पार्ट 2, धुरंधर बॉक्स ऑफिस कलेक्शन, धुरंधर बजट
३ तासांचा सिनेमा, पण प्रेक्षक म्हणतात, "अरे, इतक्या लवकर संपला पण?" हे वाचून कोणालाही आश्चर्य वाटेल, पण आदित्य धर यांच्या 'धुरंधर' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर असा काही करिश्मा केलाय की, ७ तास जरी हा सिनेमा चालला असता तरी प्रेक्षक खुर्चीवरून हलले नसते!
advertisement
2/7
Ranveer Singh, Dhurandhar, Dhurandhar Part 2, Dhurandhar Box office collection, Dhurandhar Budget, Dhurandhar Part 2 Release Date, रणवीर सिंह, धुरंधर, धुरंधर पार्ट 2, धुरंधर बॉक्स ऑफिस कलेक्शन, धुरंधर बजट
सध्या सगळीकडे फक्त एकाच नावाची हवा आहे आणि ती म्हणजे 'धुरंधर'. पण थांबा, तुम्ही जर याला संपूर्ण सिनेमा समजत असाल, तर तुम्ही चुकताय. कारण 'धुरंधर'चा हा पहिला भाग म्हणजे तर फक्त 'ट्रेलर' होता, खरा धमाका तर अजून बाकी आहे!
advertisement
3/7
Ranveer Singh, Dhurandhar, Dhurandhar Part 2, Dhurandhar Box office collection, Dhurandhar Budget, Dhurandhar Part 2 Release Date, रणवीर सिंह, धुरंधर, धुरंधर पार्ट 2, धुरंधर बॉक्स ऑफिस कलेक्शन, धुरंधर बजट
गेल्या १४ दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जगभरात ६४० कोटींहून अधिक गल्ला जमवून हा २०२५ मधील तिसरा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला आहे.
advertisement
4/7
Ranveer Singh, Dhurandhar, Dhurandhar Part 2, Dhurandhar Box office collection, Dhurandhar Budget, Dhurandhar Part 2 Release Date, रणवीर सिंह, धुरंधर, धुरंधर पार्ट 2, धुरंधर बॉक्स ऑफिस कलेक्शन, धुरंधर बजट
रणवीर सिंगने मुख्य भूमिका साकारली असली, तरी या सिनेमाचा खरा छुपा रुस्तम ठरला आहे तो म्हणजे अक्षय खन्ना. 'रहमान डकैत'च्या भूमिकेत त्याने जे काम केलंय, त्यात तो भाव खाऊन गेला. पण आता चर्चा आहे ती म्हणजे 'धुरंधर : पार्ट २' ची!
advertisement
5/7
Ranveer Singh, Dhurandhar, Dhurandhar Part 2, Dhurandhar Box office collection, Dhurandhar Budget, Dhurandhar Part 2 Release Date, रणवीर सिंह, धुरंधर, धुरंधर पार्ट 2, धुरंधर बॉक्स ऑफिस कलेक्शन, धुरंधर बजट
पहिल्या भागात आपण रणवीर आणि अक्षयची जुगलबंदी पाहिली, पण १९ मार्च २०२६ रोजी जेव्हा दुसरा भाग येईल, तेव्हा बाजी उलटणार आहे. कारण दुसऱ्या भागाचा खरा 'धुरंधर' असणार आहे आर. माधवन! पहिल्या भागात माधवनची भूमिका थोडी कमी दिसली असली, तरी दुसऱ्या भागात तो रणवीरचा 'गुरू' म्हणून समोर येणार आहे. जासूसी आणि लढाईचे धडे माधवनच रणवीरला देणार आहे.
advertisement
6/7
Ranveer Singh, Dhurandhar, Dhurandhar Part 2, Dhurandhar Box office collection, Dhurandhar Budget, Dhurandhar Part 2 Release Date, रणवीर सिंह, धुरंधर, धुरंधर पार्ट 2, धुरंधर बॉक्स ऑफिस कलेक्शन, धुरंधर बजट
माधवनने स्वतः सांगितलं आहे की, "माझा खरा खेळ तर दुसऱ्या भागात सुरू होईल. आदित्य धर यांनी ज्या पद्धतीने हा सिनेमा रचलाय, ते पाहून मी थक्क झालोय. मणिरत्नम ते राजकुमार हिराणी अशा दिग्गजांनंतर आता आदित्यसोबत काम करणं हे माझ्यासाठी भाग्याचं आहे."
advertisement
7/7
Ranveer Singh, Dhurandhar, Dhurandhar Part 2, Dhurandhar Box office collection, Dhurandhar Budget, Dhurandhar Part 2 Release Date, रणवीर सिंह, धुरंधर, धुरंधर पार्ट 2, धुरंधर बॉक्स ऑफिस कलेक्शन, धुरंधर बजट
'धुरंधर' हा केवळ एक मसाला पट नाही, तर तो खऱ्या आयुष्यातील घटनांपासून प्रेरित आहे. पाकिस्तानमधील कराचीच्या 'लयारी' भागात भारताच्या RAW एजंट्सनी कशा प्रकारे घुसून दहशतवादी नेटवर्कचं कंबरडं मोडलं, हा थरार या सिनेमात आहे. दुसऱ्या भागात ही जिओपॉलिटिकल लढाई आणखी तीव्र होणार असून, पहिल्या भागातील अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे आपल्याला मार्च २०२६ मध्ये मिळतील.
advertisement
Satej Patil : सतेज पाटलांना विरोधी पक्षनेते पद मिळू नये धडपड? प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन
प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..
  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

View All
advertisement