घेतलं तर तुमच्यासोबत नाही तर तुमच्या शिवाय, मुंबईत अजित पवार यांची तयारी पूर्ण, मोठी माहिती समोर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चेची तयारीही भाजप-सेनेने अद्याप दाखवली नसल्याने स्वतंत्रपणे लढण्याची चाचपणी करण्यासंदर्भात राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली.
प्रणाली कापसे-कुलकर्णी, प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात जराशी कमजोर असलेली राष्ट्रवादी यंदा महापालिका निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी आतुर आहे. त्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या काही महिन्यांपासून राजकीय समीकरणांची चाचपणी केली आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीच्या चर्चा आणि जागावाटपाच्या वाटाघाटी सुरू असताना आम्हीही स्वबळासाठी तयार असल्याचे राष्ट्रवादीकडून संकेत देण्यात आले आहेत. एकंदर तुम्ही युतीत सहभागी करून घेतले तर तुमच्यासोबत येईल नाहीतर तुमच्याशिवाय निवडणूक लढू, असे संकेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मित्रपक्षांना दिले आहेत.
महापालिका निवडणुकांची घोषणा होताच निवडणुकांसाठी सदा सर्वकाळ तयार असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने मित्रपक्ष शिवसेनेशी जागा वाटपाची बोलणी सुरू केली आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत मुंबईतील अनेक जागांसंदर्भात सखोल चर्चा झाली. महायुतीच्या पहिल्याच फेरीत १४२ जागांचा तिढा सुटल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. असे असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चेची तयारीही भाजप-सेनेने अद्याप दाखवली नसल्याने स्वतंत्रपणे लढण्याची चाचपणी करण्यासंदर्भात राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली.
advertisement
घेतलं तर तुमच्यासोबत नाही तर तुमच्या शिवाय, अजित पवार यांची रणनीती
महायुतीने जर सोबत घेतले तर त्यांच्यासोबत लढण्याची तयारी अजित पवार यांनी दर्शवली आहे. मात्र जर त्यांनी सोबत घ्यायला नकार दिला तर महायुतीशिवाय स्वतंत्रपणे लढण्याची रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसने आखली आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी देखील पूर्ण झाल्याची माहिती कळते आहे.
advertisement
मुंबईत किमान ५० जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी पूर्ण
निवडणूक निर्णय समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकांसंदर्भातील तयारीचा आढावा घेतला. मुंबईत किमान ५० जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी पूर्ण झाली आहे. महायुतीत राहायचे की नाही, किती जागांवर लढायचे याचा निर्णय पक्षाध्यक्ष अजित पवार घेणार असल्याची माहिती आहे.
मुंबईत बुधवारी पक्षाची महत्त्वाची बैठक
मुंबईत उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते बैठकीत सखोलपणे चर्चा करणार आहे. पक्षाध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मुंबईसह, ठाणे कल्याण डोंबिवली आणि इतर महापालिकांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका घेणार आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 16, 2025 7:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
घेतलं तर तुमच्यासोबत नाही तर तुमच्या शिवाय, मुंबईत अजित पवार यांची तयारी पूर्ण, मोठी माहिती समोर










