Suraj Chavan : मारहाण प्रकरणात सूरज चव्हाण पुरते अडकले, आधी गुन्हा दाखल, आता राजीनामा देण्याचे आदेश
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Suraj Chavan : सूरज चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. मारहाण प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेची टांगती तलवार चव्हाण यांच्यावर आहे.
मुंबई: अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना लाथा बुक्यांनी बेदम मारहाण करणे हे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांना आता महागात पडले आहे. अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष असलेल्या सूरज चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. मारहाण प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेची टांगती तलवार चव्हाण यांच्यावर आहे. आता नेत्यांच्या नजरेत भरण्यासाठी केलेला आक्रमकपणा त्यांना भोवण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्याचे अजित पवारांनी म्हटले. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 21, 2025
advertisement
अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून लातूरमध्ये रविवारी सायंकाळी मारहाण झाली होती. या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती.
सूरज चव्हाणांकडून दिलगिरी, तटकरेंच्या दौऱ्यातून वगळले...
टीकेचा भडिमार सुरू झाल्यानंतर सूरज चव्हाण यांनी सकाळी लातूरमधील घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली. अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करताना महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला धक्का लागणार नाही याची काळजी आम्ही घेत आलो आहोत. मात्र अलीकडच्या काळात काही घटक आमच्या नेतृत्वावर अत्यंत हीन पातळीवरची टीका करीत आहेत. त्याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात संताप होता असे सूरज चव्हाण यांनी म्हटले. प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे यांना निवेदन देणे किंवा त्यांच्या अंगावर पत्त्याची पाने भिरकावणे हे आम्ही समजू शकतो. तो त्यांच्या अभिनव आंदोलनाचा प्रकार असू शकतो. परंतु तिथून निघताना संबंधितांनी आमच्या नेत्यांबद्दल अत्यंत घाणेरडे उल्लेख करीत शिवीगाळ केली. ते ऐकून कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे मारहाणीचा प्रकार घडला, याबद्दल दिलगिरी व्यक्त करत असल्याचे चव्हाण यांनी म्हटले.
advertisement
छावाच्या पदाधिकार्याला लाथा-बुक्क्यांनी तु़डवलं...
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा विधिमंडळाच्या सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये छावा संघटनेचे पदाधिकारी कोकाटेंच्या निषेधार्थ निवेदन देण्यासाठी पत्रकार परिषदेत पोहचले. यावेळी त्यांनी सुनिल तटकरे यांना निवेदन देताना पत्तेही दिले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे पाटील यांना बेदम मारहाण केली. घाडगे पाटील हे या मारहाणीत जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
advertisement
सविस्तर बातमी थोड्याच वेळात...
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 21, 2025 1:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Suraj Chavan : मारहाण प्रकरणात सूरज चव्हाण पुरते अडकले, आधी गुन्हा दाखल, आता राजीनामा देण्याचे आदेश