Video: माझ्या नादाला लागू नको, चुरू चुरू बोलू नको, अजितदादांची पुतण्याला वॉर्निंग
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
एनडी पाटील बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं काका पुतण्यामध्ये सामना रंगला. एकाबाजूला होते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार.. तर दुसऱ्या बाजूला होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार.
मुंबई : काका पुतण्यांचा राजकीय संघर्ष महाराष्ट्राला अनेक वर्षांपासून परिचित आहे. त्याच संघर्षाची हलकी फुलकी झलक शनिवारी दिसली ती इस्लामपुरात. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आलेले अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात रंगलेल्या जुगलबंदीची जोरदार चर्चा आहे. माझ्या नादाला लागून नकोस आणि चूरु चूरु बोलू नकोस म्हणत अजितदादांनी हसत हसत त्यांचे पुतणे रोहित पवारांना सर्वांसमक्ष दम भरला.
एनडी पाटील बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं काका पुतण्यामध्ये सामना रंगला. एकाबाजूला होते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार.. तर दुसऱ्या बाजूला होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार. नव्या दमाच्या रोहित पवारांनी टी ट्वेन्टी स्टाईलने काका अजित पवारांसमोर एकामागोमाग एक बाऊंसरचा मारा केला. दुसरीकडे जयंत पाटलांसारखा अत्यंत मुरब्बी आणि खास ठेवणीतल्या शब्दांच्या गुगलीने समोरच्याला बाद करणारा नेता. पण त्यांच्या समोर होते पहिल्याच बॉलपासून स्टान्स घेतेलेले अजितदादांसारखे फटकेबाजी करणारा नेते. अराजकीय मंचावर तुफान राजकीय फटकेबाजी रंगली. या राजकीय फटकेबाजीचे मॅन ऑफ द मॅच ठरले अर्थातच अजित पवार. जयंत पाटील आणि रोहित पवारांच्या फिरक्यांना त्यांनी चांगलंच टोलावून लावलं. रोहित पवारांनी अजितदादांना गावकी आणि भावकीची आठवण करु दिली. पण अजित दादांनी रोहित पवारांना गपगार करत राजकीय मैदानाचे सिकंदर आपणच असल्याचं दाखवून दिलं.
advertisement
रोहित पवारांनी या संस्थेसाठी आर्थिक मदतीची घोषण करतानाच मंत्री चंद्रकांत पाटील आणि अजित पवारांसाठी आक्रमक फिल्डींग लावली होती. कारण रोहित पवारांनंतर हे दोन्ही नेते भाषण करणार होते. त्यामुळे आता चंद्रकांत दादा आणि अजितदादा किती मदत करणार? याकडे उपस्थितांचे लक्ष लागून राहिलं होतं. पण दोन्ही दादांनी कसलेल्या बॅट्समन प्रमाणे रोहित पवारांचा बाऊंसर थेट स्टेडिअम बाहेर टोलावला.
advertisement
एकीकडून रोहित पवारांनी शाब्दिक यॉर्कर टाकले तर दुसऱ्या एन्डने जयंत पाटलांनी शाब्दिक फिरकीचा मारा केला. पण अजितदादा फुल्ल फॉर्मात होते. त्यांनी जयंत पाटलांच्या फिरकीचा मारा सपशेल परतावून लावला. मी माझं काम करतो, कुणावर टीका करत नाही. माझ्या नादाला लागायचं नाही, असे म्हणत अजित पवार यांनी विरोधकांना वॉर्निंगच दिली.
advertisement
वाळव्यातल्या या कार्यक्रमात मनमोकळे आणि मोकळेढाकळे अजित दादा दिसले. त्यामुळे फक्त मंचावरचे राजकीय नेते नाही तर कार्यकर्तेही दादांच्या मिश्कील टोमण्यांपासून वाचू शकले नाहीत
राज्याच्या राजकाराणात पवार घराणं वजनदार आणि प्रभावी घराणं आहे. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर दादा आणि रोहित पवारांची रंगलेली जुगलंबदी महाराष्ट्राला नवी नाही. त्याचीच झलक आज पुन्हा एकदा पहायला मिळाली. माझ्या नादाला लागून नकोस आणि चुरू चुरू बोलू नकोस म्हणत अजित दादांनी हसत हसत त्यांचे पुतणे रोहित पवारांना सर्वांसमक्ष दमच भरला.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
August 16, 2025 9:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Video: माझ्या नादाला लागू नको, चुरू चुरू बोलू नको, अजितदादांची पुतण्याला वॉर्निंग