पक्ष तुझ्या काकाचा झालाय का? अजित पवारांच्या टीकेला योगेश क्षीरसागरांचं कडक उत्तर, म्हणाले, "पक्ष तुमच्या काकाचा पण..."
- Published by:Ravindra Mane
- Reported by:SURESH JADHAV
Last Updated:
अजित पवार यांनी बीडमध्ये प्रचारसभा घेत नुकतेच भाजपवासी झालेल्या योगेश क्षीरसागरांवर टीकास्र सोडलं. आता क्षीरसागरांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे.
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी बीडमध्ये प्रचारसभा घेत नुकतेच भाजपवासी झालेल्या योगेश क्षीरसागरांवर टीकास्र सोडलं. निवडणुकीआधी एबी फॉर्म मागण्यावरून त्यांनी टीका केली. पक्ष काय तुझ्या काकाचा झालाय का? असा खोचक सवाल अजित पवारांनी विचारला. तसेच मागच्या ३०-३५ वर्षात बीडचं वाटोळ झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
अजित पवारांच्या या टीकेला आता स्वत: योगेश क्षीरसागर यांनी कडक शब्दांत उत्तर दिलं आहे. पक्ष माझ्या काकाचा नाही. पक्ष तुमच्याच काकाचा आहे. फक्त तो व्यवस्थित चालवा, अशा शब्दात योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे. दादा म्हणतात पक्ष काय तुमच्या काकाचा नाही.. मला एवढंच सांगायचे मी काही तो दावाही केला नाही. तो त्यांच्याच काकाचा पक्ष आहे. त्यांनी तो पक्ष नीट हँडल करावा.. एवढ्याच त्यांना शुभेच्छा आहेत, अशी उपरोधिक टोलेबाजी योगेश क्षीरसागर यांनी केली.
advertisement
योगेश क्षीरसागर पुढे म्हणाले, "मागील 35 वर्षांमध्ये पाच सात निवडणुका झाल्या. निवडणुकीमध्ये लोकांनी आम्हाला स्वीकारला आहे. या 35 वर्षांमध्ये त्यांच्याकडे जे उमेदवार आहेत, तेही आमच्याकडेच होते मग त्यांनी त्यावेळेस विरोध का केला नाही? असा सवाल ही योगेश क्षीरसागर यांनी उपस्थित केला.
'एबी फॉर्मचं नावही काढलं नाही'
एबी फॉर्मचे तर मी नाव सुद्धा काढलं नव्हतं. फक्त उमेदवार चांगले असावेत. शहराला परत त्रास देणारे नसावेत. पक्षात अगोदरच उमेदवारीवरून गोंधळ सुरू होता. उमेदवारी अर्ज भरण्याच्या 4 दिवस अगोदर आम्हाला साधी विचारणा सुद्धा केली नव्हती. संघटनेमध्ये गोंधळ आहे. तो येणाऱ्या कालावधीमध्ये खूप मोठा लॉस पक्षाचा होईल.
advertisement
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर काका यांनी उमेदवारला पाठिंबा दिलेला आहे. सभा देखील चांगली झाली. त्यामुळे सहाजिकच ताकद वाढली आहे. बीड नगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता येईल, असा विश्वासही योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. तसेच मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील प्रचारासाठी बीडमध्ये येणार असल्याचे डॉ. योगेश शिरसागर यांनी सांगितलं.
advertisement
अजित पवार नक्की काय म्हणाले?
योगेश क्षीरसागरांना लक्ष्य करताना अजित पवार म्हणाले, "काहीजण म्हणतात आम्हीच कामं मंजूर केली. अरे तुझ्या हातात काय होतं. मी पालकमंत्री आहे, अशा शब्दात त्यांनी योगेश क्षीरसागरांना खडसावले. तसेच निवडणुकीआधीचा प्रसंगही सांगितला. मला फोन करून ५३ एबी फॉर्म मागितले. तुझ्या काकाचा पक्ष झालाय काय? असे मी त्याला म्हणालो, असे अजित पवार यांनी भर सभेत सांगितलं.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
November 25, 2025 10:55 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पक्ष तुझ्या काकाचा झालाय का? अजित पवारांच्या टीकेला योगेश क्षीरसागरांचं कडक उत्तर, म्हणाले, "पक्ष तुमच्या काकाचा पण..."


