Akot BJP AIMIM Alliance : महाराष्ट्राच्या राजकारणात धक्कादायक वळण, सत्तेसाठी भाजपची चक्क ओवेसींच्या एमआयएमशी युती!

Last Updated:

Akot Nagar Panchayat BJP AIMIM Alliance : भाजपने अकोट नगरपंचायतीमध्ये सर्वाधिक 11 जागा जिंकल्या मात्र, 35 जागा असलेल्या नगरपंचायतीमध्ये त्यांना स्वबळावर सत्ता मिळाली नाही. सत्तेत येण्यासाठी त्यांना युतीची गरज होती.

Akot Nagar Panchayat BJP AIMIM Alliance
Akot Nagar Panchayat BJP AIMIM Alliance
Akot Nagar Panchayat BJP AIMIM Alliance : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी न पाहिलं चित्र समोर आलंय. कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या भाजपने सत्तेसाठी एमआयएमसोबत युती केल्याने आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. नुकताच नगपपंचायत आणि नगपालिका निवडणूक झाली. यातील अकोट नगरपालिकेत भाजपला बहुमत मिळालं नाही. मात्र, सत्तेत येण्यासाठी त्यांनी चक्क असुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमसोबत युती केली आहे.

भाजपची चक्क एमआयएमशी हातमिळवणी

भाजपने अकोट नगरपंचायतीमध्ये सर्वाधिक 11 जागा जिंकल्या मात्र, 35 जागा असलेल्या नगरपंचायतीमध्ये त्यांना स्वबळावर सत्ता मिळाली नाही. सत्तेत येण्यासाठी त्यांना युतीची गरज होती. पण काय... भाजपने विरोधी पक्षात सर्वाधिक पाच जागा जिंकलेल्या एमआयएमशी हातमिळवणी केली अन् सत्तेच्या चाव्या घेतल्या. भाजपच्या नेतृत्वात अकोट विकास मंच स्थापन करण्यात आला होता. आता विरोधी पक्षातील एमआयएमलाच या विकास मंचात सामील करून घेण्यात आलं आहे.
advertisement

अकोट विकास मंच

भाजपच्या आघाडीत ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष सहभागी आहे. अशातच आता एमआयएमची देखील एन्ट्री झाली आहे. अकोट नगरपालिकेत काँग्रेसचे 6 आणि वंचितचे 2 सदस्य विरोधी पक्षात आहेत. विशेष म्हणजे भाजपने काँग्रेसला सोबत न घेता एमआयएमला टाळी दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
advertisement

इतिहास जलील म्हणाले...

दरम्यान, मला अकोटमध्ये झालेल्या प्रकाराबद्दल माहिती नाही. मी तेथील प्रभारींना लिखित माहिती मागवली आहे. दहा मिनिटांमध्ये माहिती देण्याचं त्यांना सांगितला आहे त्यामुळे मी दहा मिनिटांनी आपल्या सोबत सविस्तर बोलतो. भाजपाच्या विरोधात आमचे राजकारण आहे आणि ते राहणारच, असं माजी खासदार इतिहास जलील यांनी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अकोला/
Akot BJP AIMIM Alliance : महाराष्ट्राच्या राजकारणात धक्कादायक वळण, सत्तेसाठी भाजपची चक्क ओवेसींच्या एमआयएमशी युती!
Next Article
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ,, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,, वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement