Amol Mitkari : मनेसविरोधात मिटकरींनी थोपटले दंड, मुलीसह पोलीस स्टेशनसमोर बसले आंदोलनाला

Last Updated:

अमोल मिटकरी यांनी मनसेविरोधात दंड थोपटले असून ते मुलीसह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलनाला बसले आहेत.

News18
News18
कुंदन जाधव, अकोला : आमदार अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्यानंतर हल्ल्यात सहभागी आरोपी मनसेचा सरचिटणीस कर्णबाळा दूनबळे यांच्या वर मिटकरींनी जोरदार हल्लाबोल केला आहे. अमोल मिटकरी यांनी मनसेविरोधात दंड थोपटले असून ते मुलीसह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलनाला बसले आहेत. कर्णबाळा दुनबळे याला अटक करण्याच्या मागणीसाठी अमोल मिटकरी यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे.  जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाबाहेर खाली बसून ठिय्या आंदोलन करत आहेत. अमोल मिटकरी यांच्यासोबत ही आंदोलनात त्यांची मुलगी ही सहभागी झाली आहे.
अमोल मिटकरी यांनी कर्णबाळा दुनबळे याच्यावर हल्लाबोल करताना त्याच्या अटकेचीही मागणी केलीय.  कर्णबाळा हा पोलिसांचा जावई आहे का, त्याला आधी अटक करा अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. तर जामीन मिळालेल्या मनसे कार्यकर्त्यांना हा न्यायालयाचा भाग आहे. असेही मिटकरी म्हणाले, पण कर्णबाळा याला अमोल मिटकरी कोण आहे दाखवून देईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
advertisement
अमोल मिटकरी यांच्या गाडीचा काच फोडणारा मुख्य आरोपी सचिन गालट या मनसैनिकासह 2 जणांना अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीसांनी हॉटेल आर जी येथून अटक केली आहे. राज ठाकरे यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर मनसैनिक संतप्त झाले होते. संतप्त मनसैनिकांनी शासकीय विश्रामगृहात अमोल मिटकरी थांबले असताना राडा घातला. दरम्यान सचिन गालट या मनसैनिकाने मिटकरीच्या गाडीचा काच झाडाची कुंडी फेकून फोडला होता. आज सचिन गालट आणि इतर लोकांना अटक केली आहे. काल जिल्हा प्रमुख पंकज साबळे शहर प्रमुख सौरभ भगत सह एकाला जामीन मिळाला होता
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अकोला/
Amol Mitkari : मनेसविरोधात मिटकरींनी थोपटले दंड, मुलीसह पोलीस स्टेशनसमोर बसले आंदोलनाला
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement