Akola Crime : अकोला हादरलं! मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
अकोल्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. मामानेच दहा वर्षांच्या भाचीवर अत्याचार केला आहे.
अकोला, कुंदन जाधव, प्रतिनिधी : अकोल्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. मामानेच दहा वर्षांच्या भाचीवर अत्याचार केला आहे. राज्यात आणि देशात अल्पवयीन मुलींवर आणि महिलांवर होणारे अत्याचार थांबता थांबत नाहीयेत. बदलापूरमधील घटना ताजी असतानाच अकोल्यात पुन्हा एका 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे. या प्रकरणात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, तेल्हारा तालुक्यातील 10 वर्षीय मुलगी शिक्षणासाठी अकोल्यातील आपल्या मामाकडे राहायला होती. एक महिन्याआधी घरी आई - वडील नसतांना आरोपी युवराज गवळी ( रा. हिंगणा तामसवाडी ) याने मुलीवर अत्याचार केला. तू जर याबाबत कोणालाही सांगितलंस तर तू माझ्यासोबत तुझ्या मर्जीने हे सर्व करत होतीस असं मी तुझ्या घरच्यांना सांगेल अशी धमकी आरोपीने पीडित मुलीला दिली.
advertisement
मात्र रोज होणाऱ्या अत्याचाराला कंटाळलेल्या मुलीने तिच्या भेटीसाठी आलेल्या वडिलांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि आरोपीचं कृत्य समोर आलं. दरम्यान त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी या प्रकरणी आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी 20 वर्षीय आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून, त्याला अटक केली. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Location :
Akola,Akola,Maharashtra
First Published :
August 23, 2024 10:37 AM IST