'आग लागल्यावर धूर निघत असतो त्यामुळे...'; बच्चू कडूंचं नवनीत राणांना प्रत्युत्तर
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका केली होती, आता या टीकेला बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अमरावती, संजय शेंडे प्रतिनिधी : आमदार बच्चू कडू आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. बच्चू कडू यांच्यामुळे आपला पराभव झाल्याचा आरोप नवनीत राणा यांच्याकडून करण्यात येत आहे. 'सुपारी बहाद्दूर काही बेईमान लोक आहेत, घरात राहून घरातील लोकांच्या पाठीत खंजीर खूपसणारे गद्दार आहेत. ज्या मतदारांनी मला साथ दिली त्यांना थांबवन्याचं काम काही बेईमान लोकांनी केलं. आपल्याला सुपारी बहाद्दूरचा हिशोब करायचा आहे, ' अशी टीका नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांचं नाव न घेता अचलपूरमध्ये केली होती.
दरम्यान आता या टीकेला बच्चू कडू यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'रवी राणा यांच्या विरोधात आम्ही आधीच कोर्टात गेलो आहोत, त्यांना नोटीस सुद्धा गेली असेल, आग लागल्यावर धूर निघत असतो, त्या धुराकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांना पडण्याचं दुःख आहे. आमचा हिशोब जनता घेईल, त्यांच्या हाती काय आहे? जे स्वतः पडले ते दुसऱ्याला पाडण्यात काय भूमिका बजावणार आहेत?' असा हल्लाबोल बच्चू कडू यांनी केला आहे.
advertisement
पुढे बोलताना ते म्हणाले की, राजकुमार पटेल व माझ्या विरोधात कोणीही उमेदवार दिला तरी मतदारसंघातील लोक ठरवतील, मतदान लोक करतात. आमचा सगळा हिशोब घेण्याचं काम जनता करते. तुम्ही आम्ही हिशोब घेणारे कोण? असा सवाल बच्चू कडू यांनी राणां यांना नाव न घेता केला आहे.
Location :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
August 31, 2024 12:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
'आग लागल्यावर धूर निघत असतो त्यामुळे...'; बच्चू कडूंचं नवनीत राणांना प्रत्युत्तर


