Cotton Kanthi: लाडक्या बाप्पासाठी कापसाची आकर्षक कंठी, घरच्या घरी बनवा सोप्या पद्धतीने, संपूर्ण Video
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
अनेक महिला अतिशय साध्या पद्धतीने कंठी बनवून ती बाप्पाला अर्पण करताना आपण पाहतो. पण, तुम्ही घरच्या घरी बाप्पासाठी आकर्षक अशी कंठी बनवू शकता.
अमरावती: बाप्पाचे आगमन झाल्यानंतर स्थापनेच्या वेळी हार, फुलं, दुर्वा आणि कापसाची कंठी अर्पण केली जाते. कापूस हा पवित्रता आणि शुद्धतेचे प्रतीक असल्यामुळे बाप्पाला कापसाची कंठी अर्पण करतात. अनेक महिला अतिशय साध्या पद्धतीने कंठी बनवून ती बाप्पाला अर्पण करताना आपण पाहतो. पण, तुम्ही घरच्या घरी बाप्पासाठी आकर्षक अशी कंठी बनवू शकता. लाडक्या बाप्पासाठी कापसाची आकर्षक कंठी कशी बनवायची? पाहुयात.
कापसाची कंठी बनविण्यासाठी लागणारे साहित्य
मेडिकेअरसाठी वापरतात तो कापूस, फेविकॉलचे पाणी, टिकली आणि लेस हे साहित्य लागेल.
कापसाची कंठी कशी बनवायची?
सर्वात आधी कापसाचे तीन भाग करून घ्यायचे आहेत. आपल्याला कंठी कोणत्या साईजची पाहिजे त्या आकाराचे कापसाचे तीन भाग करून घ्या. त्यानंतर त्यातील एक एक भाग घेऊन त्याचे वस्त्र बनवून घ्यायचे आहे. वस्त्र बनविण्यासाठी फेविकॉलचे पाणी वापरायचे आहे. त्यामुळे माळ तुटणार नाही.
advertisement
वस्त्र बनवून झाल्यानंतर त्याची कंठी तयार करायची आहे. आपण केसांची वेणी गुंफतो तशी वेणी गुंफून घ्यायची आहे. वेणी गुंफली की त्याचे फुल तयार होत जाईल. सर्वच वस्त्रांचे फुल तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यावर फुलांच्या मधोमध टिकली लावायची आहे. त्यात तुम्ही कुंकू सुद्धा लावू शकता. तसेच फेविकॉलच्या पाण्यात देखील कलर टाकून घेऊ शकता.
advertisement
संपूर्ण फुलांवर टिकली लावून झाल्यानंतर त्याला लेस लावून घ्यायची आहे. लेसऐवजी तुम्ही पूजेचा धागा देखील वापरू शकता. तसेच डिझाईनसाठी आणखी साहित्य सुद्धा त्यात घेऊ शकता. त्यानंतर कापसाची कंठी तयार झाली असेल. अशाप्रकारे तुम्ही लाडक्या बाप्पासाठी घरच्या घरी कापसाची कंठी बनवू शकता.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Aug 26, 2025 7:15 PM IST
मराठी बातम्या/अमरावती/
Cotton Kanthi: लाडक्या बाप्पासाठी कापसाची आकर्षक कंठी, घरच्या घरी बनवा सोप्या पद्धतीने, संपूर्ण Video









