परिस्थितीवर मात केली, जिद्दीने पुढे गेली, आता 30 मुलांची आई, कोण आहे पिंकी भोसले?

Last Updated:

प्रज्ञा प्रबोधिनी अमरावती जिल्ह्यात गेल्या 21 वर्षापासून पारधी समाजाच्या उन्नतीसाठी सातत्याने सेवाकार्य करीत आहे. याच ठिकाणी काम करतात, पिंकी भोसले. गेले 13 वर्ष त्या पारधी समाजाच्या मुलांचे संगोपन करत आहे. 

+
News18

News18

प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी 
अमरावती : प्रज्ञा प्रबोधिनी अमरावती जिल्ह्यात गेल्या 21 वर्षापासून पारधी समाजाच्या उन्नतीसाठी सातत्याने सेवाकार्य करीत आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 9 तालुक्यात 40 पारधी गावात, वस्त्यांमध्ये काम सुरू आहे. सर्व वस्त्यांमध्ये पारधी समाजासाठी विकासाचे अनेक उपक्रम राबविले जातात. याच संस्थेत पिंकी नरेंद्र भोसले या काम करतात. आपलं मुलं 6 महिन्याच असताना पिंकी आपल्या पतीसह छात्रावासमध्ये आली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत ती याच ठिकाणी पारधी वस्तीतील मुलांचे संगोपन करीत आहे. पुढेही ते हेच काम करणार आहे. पण, यातूनच आणखी काही कामे पिंकी ने केली आहेत. छात्रावासमध्ये 13 वर्ष आधी आलेली पिंकी आणि आताची 30 मुलांचे संगोपन करणारी पिंकी यात खूप फरक जाणवून येत आहे.
advertisement
पिंकी भोसले यांच्याशी लोकल18 ने संवाद साधला तेव्हा त्या सांगतात की, मी दिवानखेडची राहणारी आहे. माझे पती बीएड करत असताना ते नागपूरला गेले होते. त्याठिकाणी अविनाश देशपांडे सरांशी ओळख झाली. त्यांना आम्ही पैशाची मदत मागितली होती. तेव्हा त्यांनी मदत तर केलीच. पण, हे सुद्धा सांगितलं की, मी एक छात्रावास सुरू करत आहे. त्याठिकाणी तू आणि तुझी पत्नी पर्यवेक्षक आणि सह पर्यवेक्षिका म्हणून काम करणार का? तुम्हाला अमरावतीला यावं लागेल. यांनी घरी आल्यावर सांगितलं. तेव्हा घरचे नाही म्हणत होते आणि माझी सुद्धा इच्छा नव्हती. तेव्हा मी दारू बनवून विकत होती. परिस्थिती अतिशय बेताची होती. त्यामुळं आम्हाला इकडे यावं लागलं. इथे येवून आम्ही येथे रमून गेलो आणि या कार्यांत आज मला 13 वर्ष होत आहे. याठिकाणी सध्या 30 मुलं आहेत. त्यांचे संगोपन आम्ही करत आहोत. आम्हाला कुठलेही शासकीय अनुदान नाही. फक्त आणि फक्त समाजातील लोकांच्या सहकार्यातून हे काम आम्ही करत आहोत.
advertisement
त्याचबरोबर, हिंगलाजपुर, धानोरा फशी व दिवानखेड येथे महिलांचे बचत गट यशस्वीपणे गेल्या 15 वर्षापासून चालवित आहोत. तिनही बचत गटाचे सचालन यशस्वीपणे बचत गटातील महिला करीत आहेत. या सर्व ठिकाणी प.पू. श्री. गुरूजी गोळवलकर यांचे नावाने माधव आरोग्य रक्षक योजना सुरू केली असून या अंतर्गत आम्ही त्यांना सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा निःशुल्क देत आहोत. प्रत्येक वस्तीत प्रथमोपचार पेटी दिली आहेत. त्यात प्राथमिक स्वरूपात लागणारी सर्व औषधे त्यातून देत आहोत. ही पेटी कशी हाताळावी याचे प्रशिक्षणही आरोग्य रक्षकांना तज्ज्ञ डॉ. कडून देतो. आरोग्य रक्षक नियुक्त केले आहेत. वस्त्यांमध्ये जे पारधी बंधू शेती करतात त्यांना शेती करीता मदत म्हणून बी बियाणे, खते तर कधी आर्थिक मदतही स्व. नानाजी देशमुख कृषि सहाय्यता योजनेअंतर्गत करतो. कमी खर्चाची शेती, नैसर्गिक शेती करावी म्हणून यांचे प्रशिक्षणही दिले आहे.
advertisement
छात्रावासबाबत माहिती 
अमरावतीत गेल्या 11 वर्षापासून पारधीपाल्यांसाठी विवेकानंद छात्रावास सुरू केले असून ते आता दस्तूरनगर भागात राजश्री कॉलनीत स्वतःच्या वास्तूत स्थिरावले आहे. निरनिराळ्या पारधी वस्तीतून विद्यार्थी या छात्रावासात आले आहेत. त्यांची निःशुल्क निवास, भोजन व शिक्षणाची व्यवस्था आम्ही केली आहे. वसतिगृह अद्यावत आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश अमरावतीत नामवत शाळेत केले आहे. शाळेव्यतिरिक्त शिकवणी सुद्धा आम्ही त्यांना लावून दिली आहे. छात्रावासात नियमित स्वरूपात संस्कार वर्ग होतो. राष्ट्रीय व भारतीय सणांचे आयोजनही करतो. छात्रावासाची स्वतंत्र अशी संचालन समिती आम्ही गठीत केली आहे. छात्रावासात निवासी पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक आणि निवासी शिक्षकही नियुक्त केले आहेत. आता पर्यंत छात्रावासातून 15 विद्यार्थी 10,12 वी झाले आहेत. काही जण पदवीधर, एक जण पदव्युत्तर झाला आहे. कुणी आयटीआय, तर एमसीव्हीसी तील अभ्यासक्रम केला आहे. ही छात्रावासाची यशोगाथा आहे. छात्रावासात एकुण 30 विद्यार्थी या शैक्षणिक सत्राल आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
परिस्थितीवर मात केली, जिद्दीने पुढे गेली, आता 30 मुलांची आई, कोण आहे पिंकी भोसले?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement