मायेचे छत्र हरवले आणि पदरी पडला जिव्हारी लागणारा संघर्ष; गाथा दोघी बहिणींच्या संघर्षाची, अफाट कष्ट करणाऱ्या रणरागिणीची

Last Updated:

amravati sisters struggle story - सुशीला आणि बेबी या दोन बहिणी वरूड तालुक्यातील पुसला या गावात राहतात. आई वडिलांचे छत्र हरवले आणि त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आली. या दोघींनी परिस्थिती समोर हार न मानता त्यावर मात केली आणि पंढरीच्या जंगलात शेती करायला सुरुवात केली.

+
मायेचे

मायेचे छत्र हरवले, पदरी जिव्हारी संघर्ष; अमरावतीच्या दोन रणरागिणींच्या संघर्षाची कहाणी!

प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती - आईच्या कुशीत मायेची ऊब असते आणि बाबाचा हात डोक्यावर असेल तर आयुष्यात कशाचीही कमी होत नाही. त्यांचं असणंच महत्वाचं असतं. पण, जेव्हा आईच्या मायेची ऊब आणि बाबाचे छत्र हरवते. तेव्हा मात्र मुलांचे बालपण हरवून जाते. अमरावती जिल्ह्यातील पुसला गावात राहत असलेल्या दोन बहिणीची अशीच एक संघर्षमय कथा आहे.
advertisement
सुशीला आणि बेबी या दोन बहिणी वरूड तालुक्यातील पुसला या गावात राहतात. आई वडिलांचे छत्र हरवले आणि त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आली. या दोघींनी परिस्थिती समोर हार न मानता त्यावर मात केली आणि पंढरीच्या जंगलात शेती करायला सुरुवात केली. शेतात त्या रात्रंदिवस मेहनत करतात आणि आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या या संघर्षाची गाथा आपण आज जाणून घेऊया.
advertisement
अमरावतीमधील वरूड तालुक्यात पुसला गावामध्ये दशरथ बिडकर आणि त्यांचे कुटुंब राहत होते. आता त्यांच्या दोन मुली फक्त तिथे राहतात, लोकल18 शी बोलतांना त्यांनी सांगितले की, आई आणि 5 बहिणींसह राहत असताना वडील दशरथ बिडकर हे व्यसनाच्या आहारी गेले. त्यानंतर त्यांचे आयुष्यच पालटले. अगदी राहायला घर नाही, घरात काहीच नाही अशी परिस्थिती त्यांच्या पुढे निर्माण झाली.
advertisement
दशरथ बिडकर हे काही दिवस कुटुंब सोडून इतर ठिकाणी राहायला गेले. त्यामुळे 5 मुलींच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्या पत्नीवर आली. त्यांच्या पत्नी आणि मुली दुसऱ्याच्या शेतात काम करत असते. असेच सुरू असताना त्यांनी झोपडी बांधून त्या तिथे राहत होत्या. काही दिवसांनी दशरथ बिडकर आजारी पडले आणि आपल्या कुटुंबाच्या जवळ आले. मुली दुसऱ्याच्या शेतात काम करतात हे आपण त्यांनी स्वतः च्या शेतात काम करण्याचा सल्ला मुलींना दिला.
advertisement
तेव्हा त्यांची 4 एकर जमीन पडीक होती. 5 मुली आणि त्यांच्या पत्नीने ते शेत पेरणी योग्य करून 2000 साली शेती करायला सुरुवात केली. तेव्हा सुद्धा त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. दशरथ बिडकर हे व्यसनी असल्याने घरात त्रास देत होते. नंतर आजाराने त्यांचा मृत्यू झाला. अगदी 2 वर्षांनी त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला. मग कुटुंबात फक्त त्या 5 बहिणी राहल्या. त्यापैकी 3 बहिणींनी आपला संसार थाटला. बेबी आणि सुशीला मात्र अजूनही शेती करत आहे.
advertisement
गेल्या 10 वर्षापासून त्या दोघींनी स्वतःला शेतामध्ये झोकून दिलं आहे. त्यांचे शेत घराजवळून 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि ते सुद्धा पंढरीच्या जंगलात. ओलीत करण्यासाठी त्यांना रात्रीचे सुद्धा शेतात काम करावे लागते. शेतात जाण्यासाठी त्यांच्या कडे साधन नाही. दिवसा कधी पायी तर काही अंतर ऑटोने पार करतात. रात्री मात्र इतके नंतर त्यांना पाई पार करावे लागते. शेतात जाताना तीन नाले पार करून जावे लागते.
advertisement
या दोघींना काम करत असताना अनेक त्रास सहन करावे लागतात. एकट्या मुली बघून अनेकदा लोक त्रास देतात. शेती एकदम जंगलात असल्याने प्राण्यांची भीती असते. हा सर्व संघर्षमय प्रवास त्या कुठलाही आधार न घेता करत आहेत. शेतीमधून त्या बऱ्यापैकी उत्पन्न घेतात. त्या दोघींना एकमेकांशिवाय कोणताही आधार नाही. तरीही त्या जिव्हारी लागणारा संघर्ष करत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
मायेचे छत्र हरवले आणि पदरी पडला जिव्हारी लागणारा संघर्ष; गाथा दोघी बहिणींच्या संघर्षाची, अफाट कष्ट करणाऱ्या रणरागिणीची
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement