सैन्य दलामध्ये विविध पदांसाठी नोकरभरती, कुठे आणि केव्हा होणार?
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
नाशिक देवळाली कॅम्प येथे शनिवार, दि. 15 नोव्हेंबर 2025 पासून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होत आहे. या भरतीत 116 इन्फंट्री बटालियन टीए पॅरा, 118 इन्फंट्री बटालियन (टीए) ग्रेनेडियर्स, आणि 123 इन्फंट्री बटालियन (टीए) ग्रेनेडियर्स या तीन युनिट्समध्ये भरती होणार आहे.
नाशिक देवळाली कॅम्प येथे शनिवार, दि. 15 नोव्हेंबर 2025 पासून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होत आहे. या भरतीत 116 इन्फंट्री बटालियन टीए पॅरा, 118 इन्फंट्री बटालियन (टीए) ग्रेनेडियर्स, आणि 123 इन्फंट्री बटालियन (टीए) ग्रेनेडियर्स या तीन युनिट्समध्ये भरती होणार आहे.
या भरतीसाठी पुढीलप्रमाणे पदांचे तपशील निश्चित करण्यात आले आहेत
• सोल्जर (जनरल ड्युटी): 303 पदे
• सोल्जर (ट्रेड्समन लिपिक): 16 पदे
• लिपिक: 2 पदे
• शेफ (कम्युनिटी): 5 पदे
• शेफ (स्पेशल): 2 पदे
• मेस कूक: 1 पद
• आर्टिजन (वुडवर्क): 1 पद
• हाऊस कीपर: 1 पद
advertisement
• हेअर ड्रेसर: 2 पदे
• वॉशरमॅन: 2 पदे
भरती मोहिम शनिवार, दि. 15 नोव्हेंबर ते शुक्रवार, दि. 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीत पार पडणार आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांतील युवकांनी स्व. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा मैदान, देवळाली कॅम्प येथे उपस्थित राहावे असे आवाहन लष्करी प्रशासनाने केले आहे.
अशी राहणार भरतीचे वेळापत्रक
advertisement
15 नोव्हेंबर (सकाळी 5 वा.) – गुजरात, गोवा, पाँडेचरी, दादरा नगर हवेली, दिव-दमण, लक्षद्वीप आणि केंद्रशासित प्रदेश.
16 नोव्हेंबर (सकाळी 5 वा.) – तेलंगणा, गुजरात आणि महाराष्ट्रातील जिल्हे: कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग.
17 नोव्हेंबर (सकाळी 5 वा.) – सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे.
18 नोव्हेंबर (सकाळी 5 वा.) – अहमदनगर, अकोले, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव.
advertisement
19 नोव्हेंबर (सकाळी 5 वा.) – चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, परभणी, पुणे, रायगड.
20 नोव्हेंबर – राखीव दिवस.
21 नोव्हेंबर (सकाळी 5 वा.) – कर्नाटक राज्यातील जिल्हे: कोप्पल, धारवाड, चिक्कबल्लापूर, कोलार, तुमकुरू, चित्रदुर्ग, चामराजनगर, कोडागू, हसन, बागलकोट, कलबुर्गी, बल्लारी, बिदर, चिकमंगळूर, शिवमोग्गा, रायचूर, मडग, हावेरी, विजयनगर, यदगिरी, अण्णा, कडकला, उडुपी.
advertisement
22 नोव्हेंबर (सकाळी 5 वा.) – रामनगर, मैसूर, मंड्या, बेंगळुरू अर्बन, बेंगळुरू ग्रामीण, दावनगेरे, आणि केळगाव जिल्हे.
लष्करी प्रशासनाने सर्व इच्छुक उमेदवारांना विनंती केली आहे की त्यांनी वेळेवर उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत आणि भरती प्रक्रियेत नियमांचे पालन करावे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
November 12, 2025 3:23 PM IST


