Dharavi Update: 'ते' 25 जण, अरविंद वैश्य एकटा; धारावीत त्या रात्री पोलीस चौकीसमोर काय घडलं?
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
धारावीत अरविंद वैश्य या तरूणाची हत्या करण्यात आली, त्यानंतर त्या ठिकाणी मोठा संघर्ष उद्भवला. तणाव पाहायला मिळाला, नेमकं त्या रात्री पोलीस चौकीसमोर काय घडलं?...
तुषार रूपनवर, प्रतिनिधी
धारावी, मुंबई: काल धारावीत अरविंद वैश्य या युवकांची हत्या झाली, आणि या हत्येला सांप्रदायिक तणावातून हत्या झाल्यात समोर आलं.त्यानंतर काल रात्रीपासून धारावी परीसरात तणावाच वातावरण निर्माण झालं. अरविंदच्या हत्येनंतर धारावी परीसरात मोठी होर्डिंग बाजी करण्यात आली. त्यामध्ये "व्यर्थ न जायेगा बलिदान" या आशयाचा मजकूर टाकण्यात आला. आणि हे पोस्टर संपूर्ण धारावी मध्ये लावण्यात आले. आणि इथचं वादाची खरी ठिणगी पडली.धारावी परिसरात हिंदु आणि अल्पसंख्याक याची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे.या हत्येला सांप्रदायिक किनार असल्याचा आरोप काही हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे.आणि यामुळे धारावी मध्ये कालपासून तणावाच वातावरण निर्माण झालं.
advertisement
आज धारावीत तणाव: आज दुपारी धारावीला पोलिस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं. मुंबई पोलिसांच्या तुकड्या धारावीच्या विविध भागात तैनात करण्यात आल्या. मात्र, तरीही धारावी मध्ये जेव्हा अरविंद वैश्य यांची अंतयात्रा निघाली तेव्हा काही जमावाकडून दगडफेक करण्यात आली आणि पुन्हा या सांप्रदायिक वादाचा भुकंप या धारावी मध्ये पाहायला आणि अनुभवायला मिळाला. प्रसंगावधान सांभाळून जागोजागी पोलिस बंदोबस्त वाढवला. या प्रकरणात आता दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी करण्यात येत आहे. पण अरविंद वैश्यबद्दल अनेक प्रश्न निर्माण झालेत, त्याचाच आढावा.
advertisement
अरविंद वैश्य कोण होता?
अरविंद हा बजरंग दलाचा पदाधिकारी होता, आणि गेल्या वर्षापासून हिंदुत्ववादी विचाराला प्रेरित होऊन काम करत होता. धारावी परिसरात तो या कामासाठी ओळखला जात होता.
हत्या का झाली?
लँन्ड जिहादच्या वादातून अरविंद वैश्य या हिंदुत्ववादी तरूणाची हत्या केली असल्याचं बोललं जात आहे. अरविंदने पाणी ठेवण्यासाठी छापड बांधकाम करतात, त्या बांधकामाला विरोध केला. हे छापड प्रामुख्याने मोहरम या सणामध्ये 30 दिवसासाठी पाणी देण्यासाठी ठेवले जातात. मात्र असे छापड बांधून जमीन हाडपले जातात असा अरविंदचा आरोप होता. म्हणून अरविंदने विरोध केला होता. सुरूवातीला काल त्याला 25 जणांनी मारहाण केली. त्यानंतर तो पोलिस स्थानकात तक्रार करण्यासाठी गेला असता तक्रार का केली म्हणून काल रात्री त्याचा खून करण्यात आला.
advertisement
या प्रकरणात काय-काय कारवाई झाली?
या प्रकरणात तुर्तास दोन जणांना पोलिसांनी अटक केली असून 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि सदर प्रकरणात 07 जण अजूनही फरार आहे. आणि इतर 25 जणांवर दंगल करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 30, 2024 9:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dharavi Update: 'ते' 25 जण, अरविंद वैश्य एकटा; धारावीत त्या रात्री पोलीस चौकीसमोर काय घडलं?