दंड लागताच, माफी मागितली अन् टाकलेला कचरा परत घरी उचलून नेला; कोल्हापुरात स्वच्छता मोहिमेचा 'अजब' परिणाम!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Kolhapur News : कोल्हापूर शहरात स्वच्छतेला बाधा आणणाऱ्यांवर महापालिकेने कठोर कारवाई सुरू केली आहे. याच मोहिमेअंतर्गत उघड्यावर कचरा टाकणाऱ्या दोन नागरिकांना...
Kolhapur News : शहराच्या स्वच्छतेला बाधा आणणाऱ्या नागरिकांवर महापालिकेने दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेअंतर्गत शुक्रवारी क्रांतीसिंह नाना पाटील नगर आणि भाजी मंडई चौकात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या दोन नागरिकांना प्रत्येकी 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
महापालिकेच्या पथकाला पोतदार शाळेजवळ आणि भाजी मंडई चौकात 7 ते 8 नागरिक उघड्यावर कचरा टाकताना दिसले. पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयांचा दंड मागितला. तेव्हा काही नागरिकांनी माफी मागून आपला कचरा परत उचलून नेला.
आरोग्य विभाग सतर्क
गेल्या काही दिवसांपासून शहर आणि उपनगरांमध्ये कचऱ्याची समस्या गंभीर झाली होती. यावर सतत होत असलेल्या टीकेनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाईचे धोरण स्वीकारले आहे. यामुळे उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
advertisement
ज्या-ज्या ठिकाणी सतत कचरा टाकला जातो, अशा ठिकाणी आता महापालिकेचे कर्मचारी सतत नजर ठेवून आहेत. यामुळे कचरा टाकणाऱ्यांवर जरब बसली असून, नागरिकांनी आता अधिक काळजीपूर्वक कचरा व्यवस्थापन करण्यास सुरुवात केली आहे.
हे ही वाचा : Pune Traffic : पुणेकरांसाठी मोठी बातमी! स्वारगेट भुयारी मार्ग काही दिवसांसाठी बंद; जाणून घ्या पर्यायी रस्ते
advertisement
हे ही वाचा : कोल्हापूरकर लक्ष द्या! नवरात्र-दिवाळीत अंबाबाई मंदिर परिसरातील रस्ते खुले राहणार, पण...
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 20, 2025 9:10 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दंड लागताच, माफी मागितली अन् टाकलेला कचरा परत घरी उचलून नेला; कोल्हापुरात स्वच्छता मोहिमेचा 'अजब' परिणाम!