कोल्हापूरकर लक्ष द्या! नवरात्र-दिवाळीत अंबाबाई मंदिर परिसरातील रस्ते खुले राहणार, पण...

Last Updated:

नवरात्र आणि दिवाळीमध्ये कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी खुले राहणार आहेत. यामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला कोणताही...

Kolhapur News
Kolhapur News
कोल्हापूर : नवरात्रोत्सव आणि दिवाळीदरम्यान अंबाबाई मंदिर परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी खुले ठेवले जातील, तसेच बॅरिकेड्स लावले जाणार नाहीत, अशी ग्वाही पोलीस प्रशासनाने दिली आहे. यामुळे फेरीवाले आणि व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला कोणताही अडथळा येणार नाही. मात्र, या काळात स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी स्वयंशिस्त पाळावी, अशी अपेक्षाही प्रशासनाने व्यक्त केली आहे.
व्यापाऱ्यांच्या बैठकीत निर्णय
उत्सवाच्या काळात येणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी अंबाबाई मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी सराफ असोसिएशनच्या सभागृहात एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला महापालिका आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, अनधिकृत रिक्षा थांबे हटवले जातील, रस्त्यांवरील पॅचवर्क सुरू आहे. अंबाबाईची पालखी मिरवणूक ज्या दिवशी असेल, तो दिवस वगळून इतर सर्व दिवस महाद्वार रोड, जोतिबा रोड, राजोपाध्ये रोड, गुजरी आणि भाऊसिंगजी रोड वाहतुकीसाठी खुले असतील.
advertisement
उत्सवासाठी विशेष नियोजन
या काळात भाविकांच्या सोयीसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पागा बिल्डिंग, मेन राजाराम आणि कपिलतीर्थ मार्केट येथे स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे. महिलांसाठी गांधी मैदान, बिंदू चौक, निर्माण चौक आणि भवानी मंडप येथे विशेष स्वच्छतागृहे असतील.
स्वच्छतेसाठी मुकादम आणि कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे. उत्सवकाळात दिवसातून तीन वेळा कचरा उचलला जाईल. पावसाळा संपताच रस्त्यांवर थर्मल पट्टे मारले जातील. तसेच, अनधिकृत रिक्षा थांब्यावर आणि पट्ट्याबाहेर उभ्या राहणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई केली जाईल.
advertisement
याशिवाय, अल्लादियां खां पुतळा ते मिरजकर तिकटी परिसरात बॅरिकेड्स लावले जातील, जिथे वैद्यकीय व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांच्या वाहनांसाठी वेळेनुसार नियोजन केले जाईल. या काळात 24 तास पोलीस गस्त घालणार असून, अत्यावश्यक सेवांच्या गाड्यांना कोणताही अडथळा येणार नाही.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोल्हापूरकर लक्ष द्या! नवरात्र-दिवाळीत अंबाबाई मंदिर परिसरातील रस्ते खुले राहणार, पण...
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement