पुणेकरांसाठी खुशखबर! पुणे- जळगाव- भुसावळ दरम्यान तीन नवीन विशेष रेल्वे धावणार

Last Updated:

Pune- Jalgaon- Bhusaval Train : सणासुदीच्या काळात तिकीट न मिळाल्याने अनेकदा प्रवाशांची गैरसोय होते. प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने दिवाळीच्या हंगामात विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.

पैसे किती दिवसांत परत मिळतात?साधारणतः ऑनलाइन तिकीटाचा रिफंड 7 ते 10 वर्किंग दिवसांत खात्यात जमा होतो. काउंटर तिकीटासाठीही तत्सम प्रक्रिया लागू आहे.
पैसे किती दिवसांत परत मिळतात?साधारणतः ऑनलाइन तिकीटाचा रिफंड 7 ते 10 वर्किंग दिवसांत खात्यात जमा होतो. काउंटर तिकीटासाठीही तत्सम प्रक्रिया लागू आहे.
शारदीय नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आणि छटपूजा यांसारखे महत्वाचे सण पुढच्या काही दिवसांमध्ये येऊन ठेपले आहेत. सणासुदीच्या काळात नोकरी आणि व्यवसायानिमित्त आपल्या मूळ गावापासून दूर राहणारे चाकरमानी आपापल्या गावी जात असतात. परिणामी या काळात वाहतूक व्यवस्थेवर ताण येतो. विशेषत: सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते.
तिकीट न मिळाल्याने अनेकदा प्रवाशांची गैरसोय देखील होते. प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने दिवाळी आणि छठ उत्सवाच्या हंगामात विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.
पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीच्या ठरणार्‍या काही रेल्वे गाड्यांना यापूर्वीच जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यानंतर आणखी तीन रेल्वे ट्रेनला दोन्ही स्थानकांवर थांबा मिळाला आहे. थांबा मिळालेल्या ट्रेनमध्ये पुणे-दानापुर, पुणे-गाजीपुर सिटी-पुणे आणि नागपूर-हडपसर या तीन रेल्वे गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. या विशेष रेल्वे गाड्यांना भुसावळ आणि जळगाव रेल्वे स्थानकांवर थांबा मिळाल्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची सोय झाली आहे.
advertisement
खरंतर जळगाव जिल्ह्यातून नेहमी हजारो प्रवासी पुण्यामध्ये नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त ये- जा करत असतात. जळगावहून पुण्याला जाण्यासाठी फार मर्यादित रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत. यापूर्वी भुसावळ-पुणे दरम्यान सुरू करण्यात आलेली हुतात्मा एक्स्प्रेस प्रवाशांसाठी खूपच सोयीची ठरली होती. मात्र, ती गाडी भुसावळऐवजी आता अमरावतीहून सोडण्यात येते. इतर बऱ्याच लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्या जळगावमार्गे पुणे जात असल्या, तरी त्यांना थांबा नाही. यातच आता आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जळगाव- भुसावळमार्गे काही विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या प्रशासनाने घेतला आहे. गर्दीच्या हंगामात प्रवाशांना त्यामुळे बऱ्यापैकी दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या कायम भरलेल्याच असतात. त्यामुळे बऱ्याचदा जळगाव- भुसावळच्या प्रवाशांना जागा मिळत नाही.
advertisement
या विशेष रेल्वे गाडीच्या दोन्ही बाजुने एकूण 38 फेऱ्या होतील. 01431 विशेष गाडी 26 सप्टेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शुक्रवारी आणि मंगळवारी पुणे येथून 06:40 वाजता सुटेल, तर जळगाववरून दुपारी 03:23 मिनिटांनी सुटेल तर, भुसावळ रेल्वे स्थानकावर दुपारी 03:55 मिनिटांनी पोहोचेल. यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी 07:40 वाजता गाजीपुर सिटी स्थानकावर पोहोचेल. 01432 विशेष गाडी 27 सप्टेंबर ते 29 नोव्हेंबर या कालाधीत प्रत्येक शनिवारी आणि बुधवारी गाजीपुर सिटीवरून रात्री 10:40 वाजता सुटेल आणि भुसावळला तिसऱ्या दिवशी सकाळी 06:20 मिनिटाने तर जळगावला 06:50 मिनिटाने पोहोचेल. तर त्याच दिवशी दुपारी 04:20 वाजता पुणे येथे पोहोचेल. या गाडीला देखील जळगाव, भुसावळ स्थानकांवर थांबा मंजूर आहे.
advertisement
या विशेष गाडीच्या दोन्ही बाजुने एकूण 40 फेऱ्या होतील. 01481 विशेष रेल्वे गाडी 26 सप्टेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत प्रत्येक सोमवारी तसेच शुक्रवारी पुणे येथून रात्री 07:55 वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी 05:28 मिनिटाने जळगावला पोहोचेल. नंतर सकाळी 05:55 मिनिटाने भुसावळ रेल्वे स्थानकावर पोहोचेल. तसेच तिसऱ्या दिवशी 10:00 वाजता दानापुर पोहोचेल. 01482 विशेष गाडी 28 सप्टेंबर ते तीन डिसेंबर या कालावधीत प्रत्येक बुधवारी आणि रविवारी दानापुर येथून दुपारी 12:30 वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी दुपारी 03:20 मिनिटाने भुसावळला पोहोचेल नंतर जळगावला दुपारी 03:45 मिनिटाने पोहोचेल. यानंतर त्याच दिवशी रात्री 11:55 वाजता पुणे येथे पोहोचेल.
advertisement
या विशेष रेल्वे गाडीच्या दोन्ही बाजुने एकूण 36 फेऱ्या होतील. 01201 विशेष गाडी 29 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक सोमवारी आणि गुरूवारी नागपूर येथून रात्री 07:40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 11:25 वाजता हडपसर येथे पोहोचेल. 01202 विशेष गाडी 30 सप्टेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी हडपसर येथून दुपारी 03:50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 06:30 वाजता नागपूर येथे पोहोचेल. ही गाडी सुद्धा जळगाव, भुसावळ स्थानकांवर थांबेल.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुणेकरांसाठी खुशखबर! पुणे- जळगाव- भुसावळ दरम्यान तीन नवीन विशेष रेल्वे धावणार
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement