Vasai News : वसईत इथं नवरात्रीसाठी हटके साड्यांचं कलेक्शन, ट्रेंडी ते पारंपरिक सर्व काही एका छताखाली!

Last Updated:

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वसईमधील गणपत राव वर्तक हॉलमध्ये ‘श्री सखी’ या बहुरंगी आणि बहुपर्यायी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 18 ऑगस्टपासून सुरू झालेले हे प्रदर्शन 21 ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

+
वसई

वसई मध्ये भव्य श्री सखी एक्सहिबिशन, ट्रेंडी ते पारंपरिक सर्व काही एका छताखाली!

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वसईमधील गणपत राव वर्तक हॉलमध्ये ‘श्री सखी’ या बहुरंगी आणि बहुपर्यायी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 18 ऑगस्टपासून सुरू झालेले हे प्रदर्शन 21 ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात पारंपरिक भारतीय संस्कृतीला आधुनिकतेची साज चढविणाऱ्या विविध उत्पादने उपलब्ध असून त्यात हस्तकला वस्तू, फॅशन आणि लाइफस्टाइलसंबंधी उत्पादने, गृहसजावटीच्या वस्तू, भेटवस्तू, आणि खाद्यपदार्थ यांचा समावेश आहे.
महिलांसाठी खास साड्यांची आकर्षक रेंज या ठिकाणी पाहायला मिळते. इरकल, कांजीवरम, कोटन, ब्लॉक प्रिंट, डोला सिल्क आणि पैठणी अशा विविध प्रकारच्या साड्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या साड्यांची किंमत 500 रुपयांपासून सुरू होऊन 2000रुपयांपर्यंत आहे. तसेच आकर्षक AD दागिन्यांची रेंजही उपलब्ध असून त्यांची किंमत 200 ते 1500 रुपयांच्या दरम्यान आहे. रंगवलेले वेगवेगळ्या प्रकारची रांगोळी साचे प्रदर्शनात खास आकर्षण ठरत आहेत. हे साचे अगदी 30 रुपयांपासून सुरू होतात आणि कोणतीही डिझाइन झटपट तयार करता येते.
advertisement
ड्रेस मटेरियलच्या विविध पर्यायांची सुरुवात 500 रुपयांपासून होते. खवय्यांसाठीदेखील येथे बरेच काही आहे. शुद्ध गायीच्या तुपात बनवलेले पारंपरिक कंदी पेढे, तसेच घरगुती पद्धतीने बनवलेले लोणची, पापड, आणि इतर पारंपरिक खाद्यपदार्थ ग्राहकांना आकर्षित करत आहेत. ‘श्री सखी’ हे प्रदर्शन केवळ खरेदीसाठीच नव्हे, तर विविधतेने नटलेला एक सांस्कृतिक अनुभव आहे, ज्याचा लाभ वसईकरांनी जरूर घ्यावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Vasai News : वसईत इथं नवरात्रीसाठी हटके साड्यांचं कलेक्शन, ट्रेंडी ते पारंपरिक सर्व काही एका छताखाली!
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement