Maharashtra Elections Navneet Rana : नवनीत राणा यांच्या सभेत राडा, 45 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल, 4 जण ताब्यात
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Navneet Rana : भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या सभेत राडा घातल्याप्रकरणी पोलिसांनी आता 45 ते 50 जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
अमरावती : भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या सभेत राडा घातल्याप्रकरणी पोलिसांनी आता 45 ते 50 जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. शनिवारी रात्री राणा यांच्या सभेत गोंधळ झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे खल्लार, दर्यापूरमध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र, पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.
माजी खासदार नवनीत राणा या खल्लार येथे युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदेले यांची प्रचार सभेसाठी दाखल झालेल्या. प्रचार सभेतील भाषण सुरू असताना त्यांच्याकडे पाहून काहीजण अश्लील हावभाव करत होते. त्यांचे भाषण संपताच राणा यांच्यावर सभास्थळी असलेल्या खुर्च्या भिरकावण्यात आल्या. यामध्ये नवनीत राणा या थोडक्यात बचावल्या. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
advertisement
नवनीत राणा यांनी आपल्याला पाहून शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. माझ्या दिशेने खुर्ची फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. माझ्यासोबत असलेले अंगरक्षक आणि सहकाऱ्यांमुळे आपण वाचलो असल्याचे राणा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सांगितले.
या प्रकरणी नवनीत राणा यांनी या घटनेची तक्रार खल्लार पोलिसात दिली. खल्लार पोलिसांनी ॲट्रॉसिटी ॲक्टसह 45 ते 50 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आला आहे. दरम्यान आरोपींना तातडीने अटक न झाल्यास मोठे आंदोलन करून असा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस पुढील तपास करत आहे.
view commentsLocation :
Amravati,Maharashtra
First Published :
November 17, 2024 8:40 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Navneet Rana : नवनीत राणा यांच्या सभेत राडा, 45 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल, 4 जण ताब्यात


