निकाल लागला, राडा सुरू, राष्ट्रवादीचे नेते सुनील कोल्हे यांच्यावर प्राणघातक हल्ला
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
आरोपींच्या हल्ल्यात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील कोल्हे गंभीर जखमी झाले आहेत. तालखेड फाट्याच्या दरम्यान हा हल्ला झाला. हल्लेखोर तोंडावर रूमाल बांधून आले होते.
राहुल खंदारे प्रतिनिधी, मोताळा, बुलडाणा : येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. तालखेड फाट्याजवळ हा हल्ला झाला असून हल्लेखोर तोंडावर रूमाल बांधून होते. दोन वेगवेगळ्या बाईकवरून आलेल्या चार जणांनी रॉडने कोल्हे यांच्यावर हल्ला चढविला.
आरोपींच्या हल्ल्यात सुनील कोल्हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा डावा पाय आणि डावा हात फ्रॅक्चर झाला असल्याची माहिती आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्ण्यालयात भरती करण्यात आले आहे असून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रुग्णालयात धाव घेतली आहे.पोलिसही घटनास्थळी दाखल झाले असून हल्ला करणाऱ्यांचा पोलीस घेत आहेत.
मोताळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर थोड्या वेळापूर्वी प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. तालखेड फाट्याच्या दरम्यान हा हल्ला झाला. हल्लेखोर तोंडावर रूमाल बांधून होते. दोन वेगवेगळ्या बाईकवरून आलेल्या चार जणांनी रॉडने कोल्हे यांच्यावर हल्ला चढविला. यात सुनील कोल्हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा डावा पाय आणि डावा हात फ्रॅक्चर झाला असल्याची माहिती आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्ण्यालयात भरती करण्यात आले आहे.
advertisement
अॅड. जयश्रीताई शेळके रुग्णालयात दाखल झाल्या असून हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. महाविकास आघाडीचे ज्यांनी प्राणपणाने काम केले अशा लोकांवर प्राणघातक हल्ले केले जात असून निकाल लागल्याच्या दिवसापासून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या घरावर तलवारी घेऊन चाल करणे, ज्यांच्या घरावर बॅनर होते त्यांना मारहाण करणे तसेच धमकावण्याचे प्रकार सुरु असल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
जयश्री शेळके म्हणाल्या, पत्रकारांशी बोलताना म्हटले की जिल्हा पोलीस प्रशासनाने अशा हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर तात्काळ कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. बुलढाण्याचा बिहार करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू असून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान कोल्हे यांना पाहण्यासाठी अनेकांनी जिल्हा रुग्ण्यालयाकडे धाव घेतली होती.
view commentsLocation :
Buldana,Maharashtra
First Published :
November 25, 2024 8:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
निकाल लागला, राडा सुरू, राष्ट्रवादीचे नेते सुनील कोल्हे यांच्यावर प्राणघातक हल्ला


