दादरमध्ये सामाजिक कार्यकर्ता चेतन कांबळेवर जीवघेणा हल्ला
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
सामाजिक कार्यकर्ता चेतन कांबळे याला दीपक चौगुले आणि त्याच्या मित्रांकडून मारहाण झाल्याचे सांगितले जाते.
संकेत वरक, प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील दादरमध्ये सामाजिक कार्यकर्ता चेतन कांबळे याच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रविवारी रात्री चेतनच्या राहत्या इमारतीत घुसून आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. अंमली पदार्थांची विक्री आणि जुगाराविरोधात त्याने अनेकदा आवाज उठवल्याने त्याच्यावर हल्ल्याचा संशय व्यक्त होत आहे.
सामाजिक कार्यकर्ता चेतन कांबळे याला दीपक चौगुले आणि त्याच्या मित्रांकडून मारहाण झाल्याचे सांगितले जाते. हल्ल्याच्या घटनेला १२ तास उलटून देखील प्रकरणातील दोन्ही आरोपी अजूनही फरार आहेत. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
चेतन कांबळे हा दादर परिसरात 'चकाचक दादर' नावाने एनजीओ चालवतो. अंमली पदार्थांची विक्री आणि जुगाराविरोधात त्याने अनेकदा आवाज उठवला आहे. याचाच राग मनात ठेवून चेतनवर हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. हल्ल्याला 12 तास उलटून सुद्धा आरोपी अजूनही फरार आहेत. याआधी सुद्धा हल्लेखोरांनी चेतनला मारण्याची धमकी दिली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 08, 2025 4:03 PM IST


