छत्रपती संभाजीनगरच्या 4 वर्षांच्या चिमुरडीची कमाल, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
कनक मुंदडा ही छत्रपती संभाजी नगर शहरातील उस्मानपुरात भागामध्ये राहते. ती अवघ्या चार वर्षाची आहे.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : लहान मुलं म्हटलं की त्यांचं खेळायचं मस्ती करण्याचं वय असतं. पण काहीजण याला अपवाद असतात. आपल्या विशेष कौशल्याने लहान वयातच मोठे पराक्रम ते करत असतात. छत्रपती संभाजीनगर शहरातील चार वर्षांची चिमुरडीने असा एक विक्रम केला आहे. कनक मुंदडा असे या चिमुरडीचे नाव आहे. 65 देशांच्या राजधान्या अवघ्या 1 मिनिट 36 सेकंदात सांगून तिनं मोठा विक्रम केला आहे. त्यामुळे वर्ल्ड वाईल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिची नोंद झाली आहे.
advertisement
कनक मुंदडा ही छत्रपती संभाजी नगर शहरातील उस्मानपुरात भागामध्ये राहते. ती अवघ्या चार वर्षाची आहे. कनकने आत्तापर्यंत अनेक रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केलेले आहेत. नुकताच तिने नवीन एक रेकॉर्ड केलेला आहे. वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. एक मिनिट 36 सेकंदामध्ये 65 देशांच्या राजधान्यांची नावे सांगून हा रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला आहे. कनकचा हा पाचवा रेकॉर्ड आहे, असे तिचे आई-वडिलांनी सांगितले आहे.
advertisement
Brahmos Engineer Nishant Agarwal : पाकिस्तानी हेरांनी ब्रह्मोस अभियंत्याचा लॅपटॉप हॅक केला, ते तीन अॅप कोणते?
कनक ही लहानपणापासूनच अत्यंत हुशार आहे. तिची स्मरणशक्ती चांगली आहे. ती कोणतीही गोष्ट पटकन लक्षात ठेवते. कनकने याआधी भारताच्या सर्व राज्यांच्या राजधानीचे नावे सांगून एक रेकॉर्ड केला होता. मग यापेक्षा काही वेगळे करता येईल का, असं आम्हाला वाटत होतं. म्हणून मग आम्ही असं ठरवलं की, तिला देशाच्या राजधान्या शिकवायच्या आणि याचा नवीन रेकॉर्ड करायचा. कनक ही लहान असल्यामुळे तिच्या मुडनुसार तिची सर्व प्रॅक्टिस घेतली. आम्ही घरी नकाशा आणला. नकाशावरून तिला देश दाखवले आणि त्यांच्या राजधान्या पण सांगितल्या. याप्रमाणे आम्ही तिच्याकडून पाठांतर करून घेतलं, असे तिची आई ममता मुंदडा यांनी सांगितले.
advertisement
या रेकॉर्डमध्ये तिच्या भावाचाही मोठे योगदान आहे. कनकचा भाऊ रणक याने तिच्याकडून तिच्या कलानुसार पाठांतर करून घेतले आणि तिला सर्व शिकवे. कनकने जो रेकॉर्ड केला आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि तिने पुढ अशीच कामगिरी करावी, असेही त्या म्हणाल्या.
महत्त्वाची बातमी! आता घरी बसूनच बुक करता येणार स्मार्टसिटी बसचे तिकीट, काय कराल?
view commentsकनकने हा जो विक्रम केला आहे यामध्ये सर्व श्रेय हे तिच्या आईचे आणि तिच्या भावाचे आहे. त्या दोघांनी मिळून कनकला हे सर्व शिकवले आणि त्यामुळे तिने हा विक्रम केला. एक वडील म्हणून मला कनकचा खूप अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया कनकचे वडील अमर मुंदडा यांनी दिली.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
June 19, 2024 6:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
छत्रपती संभाजीनगरच्या 4 वर्षांच्या चिमुरडीची कमाल, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड

