Ind Vs Pak : शॉपिंग मॉल, डी मॉर्ट आणि थिएटरमध्ये असल्यावर जर सायरन वाजला तर काय करायचं?

Last Updated:

भारत हा पाकिस्तानवरती हल्ला करण्याच्या तयारीमध्ये असतानाच संपूर्ण देशामध्ये उद्या म्हणजेच 7 मे रोजी मॉकड्रिल होणार आहे. तुम्ही शॉपिंग मॉल, डी मार्ट आणि थिएटरमध्ये असल्यावर जर सायरन वाजला तर काय करायचं? पाहुयात.

News18
News18
छत्रपती संभाजीनगर : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सध्याला ॲक्शन मोडवरती आहे. या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. याच अनुषंगाने सध्याला भारत हा पाकिस्तानवरती हल्ला करण्याच्या तयारीमध्ये असतानाच संपूर्ण देशामध्ये उद्या म्हणजेच 7 मे रोजी मॉकड्रिल होणार आहे. देशातील 234 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. तुम्ही शॉपिंग मॉल, डी मार्ट आणि थिएटरमध्ये असल्यावर जर सायरन वाजला तर काय करायचं? पाहुयात.
सर्वात पहिले तर तुम्ही सायरन वाजल्यानंतर पॅनिक होऊ नका किंवा गोंधळून जाऊ नका आणि पळापळी देखील करू नका. मॉकड्रिलच्या काळामध्ये जर तुम्ही थेटर, मॉल किंवा डी मार्ट किंवा कुठल्याही शॉपिंगच्या ठिकाणी जर अडकले असाल तर अशावेळी सायरन वाजल्यास, प्रथम शांत राहा आणि सुरक्षित ठिकाणी जा. मॉलमध्ये सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी दिलेले निर्देश किंवा मार्गदर्शनाचे पालन करा. सायरन वाजल्यास, तातडीने बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नका. ज्या पण इमारतीमध्ये असलेल्या सुरक्षित ठिकाणी जा आणि तेथील सूचनांचे पालन करा. तसेच तुम्ही थेटरमध्ये असल्यास शांत राहा. सायरन वाजल्यास, गोंधळ करू नका. सूचनेचे पालन करा.
advertisement
तसंच जोपर्यंत सायरन हा बंद होत नाही तोपर्यंत तुम्ही बाहेर पडू नकाज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी शांत उभ रहा आणि सुरक्षित ठिकाणी उभे राहावंथिएटरमॉल किंवा डी मार्ट अशा ठिकाणी जर तुम्ही असाल तर त्या ठिकाणी जर सूचना तुम्हाला दिल्या जातील त्या सर्व सूचनांचा तुम्ही पालन करा. तसेच जर तुम्हाला उद्या गरज असेल तरच तुम्ही घराबाहेर पडावे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. ज्या संरक्षण खात्याकडून सूचना येतील किंवा ज्या पोलिसांकडून तुम्हाला सूचना येतील त्या सर्व सूचनांवरती तुम्ही विश्वास ठेवावा. तर या मॉकड्रिलच्या काळात तुम्ही जर मॉलथिएटर किंवा इतरही कुठल्या ठिकाणी अडकले असाल तर अशी तुम्ही स्वतःची काळजी घ्यावी.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
Ind Vs Pak : शॉपिंग मॉल, डी मॉर्ट आणि थिएटरमध्ये असल्यावर जर सायरन वाजला तर काय करायचं?
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement