ऑफिसचे दप्तर चक्क डोक्यावर घेऊन निघाल्या उपकुलसचिव... व्यथा मांडताना अश्रू अनावर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Babasaheb Ambedkar Marathwada University: माझ्यावर सतत अन्याय होत आहे. मी चुकीच्या कामांना आडवी येत असल्याने माझा छळ होत आहे, असा आरोप उपकुल सचिव हेमलता ठाकरे यांनी केला.
सिद्धार्थ गोदाम, छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुल सचिव हेमलता ठाकरे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये उच्च पदस्थ महिला अधिकारी आपल्या कार्यालयाचे दप्तर चक्क डोक्यावर घेऊन जात आहे. यानिमित्ताने मराठवाडाचा विद्यापीठाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासन मुद्दाम शिपाई देत नसल्याने माझ्यावर ही वेळ आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आपली व्यथा मांडतांना त्यांना अश्रू अनावर झाले. माझ्यावर सतत अन्याय होत आहे. पण तरीही विद्यापीठ प्रशासन मला सहकार्य करीत नाही, असे सांगताना हेमलता ठाकरे यांना रडू कोसळले.
विद्यापीठाच्या उपकुल सचिव हेमलता ठाकरे यांची व्यथा
advertisement
प्रशासनाने माझी परीक्षा विभागातून मुख्य कार्यालयाकडे बदली केली. तिथे गेल्यानंतर मला कार्यालयीन कामकाजासाठी शिपाई असणे गरजेचे आहे. वैयक्तिक अडचणींमुळे महिला शिपाई देण्यात यावी, अशी मी वारंवार मागणी करूनही माझ्या मागणीची पूर्तता होत नाही. माझे सहकारी माझ्या अडचणींबाबत विद्यापीठ प्रशासनाला अवगत करत होते. मात्र तरीही प्रशासन कुठलेही पाऊल उचलत नव्हते. त्यामुळे मी माझी कामे स्वत: करण्याचा निर्णय घेतला. झाडू मारणे, केबिन साफ करणे तसेच माझे कार्यालयाचे दप्तर मीच स्वत: नव्या कार्यालयात घेऊन गेले, असे विद्यापीठाच्या उपकुल सचिव हेमलता ठाकरे यांनी सांगितले. तसेच मी चुकीच्या कामांना आडवं येत असल्याने माझा छळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
advertisement
दुसरीकडे विद्यापीठ प्रशासनाला न्यूज १८ लोकमतने संपर्क करण्याचा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
June 24, 2025 5:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ऑफिसचे दप्तर चक्क डोक्यावर घेऊन निघाल्या उपकुलसचिव... व्यथा मांडताना अश्रू अनावर


