Bhaskar Jadhav On Ramdas Kadam : भास्कर जाधवांची रामदास कदमांवर जहरी टीका,''बामदास कदमने भXXXX...''
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Bhaskar Jadhav On Balasaheb Thackeray Death Cotroversy : शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा गटनेते आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांचा छमछमदास कदम असा उल्लेख करत जहरी टीका केली आहे.
मुंबई: शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त दावा केल्यामुळे खळबळ उडाली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन दोन दिवसांपूर्वीच झाले होते, असा दावा रामदास कदम यांनी केला होता. त्यावरून आता ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाल्याचे चित्र आहे. शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा गटनेते आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांचा छमछमदास कदम असा उल्लेख करत जहरी टीका केली आहे.
विजयादशमीच्या दिनी शिवसेनेच्या दोन्ही गटांचा दसरा मेळावा पार पडला. शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा नेक्सो सेंटरमध्ये पार पडला. यावेळी शिवसेना नेते रामदास कदम यांनी त्यांच्या भाषणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबद्दल खळबळजनक आणि वादग्रस्त दावा केला. बाळासाहेबांचं निधन एक दिवसाआधीच झालं होतं. उद्धव ठाकरेंनी त्यांना एक दिवस का ठेवलं. हे बाळासाहेबांवर उपचार केलं हे मला डॉक्टरांनी सांगितलं होतं असा दावा रामदास कदमांनी केला. रामदास कदम यांच्या दाव्यानंतर शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार खडाजंगी होणार असल्याचे संकेत मिळत होते.
advertisement
भास्कर जाधवांची विखारी टीका...
शिवसेना नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बाळासाहेबांसदर्भात केलेल्या विधानाचा भास्कर जाधवांनी चांगलाच समाचार घेतलाय. कुवत नसलेल्या माणसांकडून टीका सुरू आहे असं म्हणत भास्कर जाधवांनी कदमांवर टीकास्त्र सोडले. माध्यमांशी बोलताना भास्कर जाधवांकडून रामदास कदमांचा उल्लेख 'बारदास कदम' असा उल्लेख केला. कदमांसारख्या श्वानांना आपण किंमत देत नाही. रामदास कदम तुला मुंबईच्या नगरसेवकांमधून दोन वेळा उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर पाठवलं. मुंबईकरांसाठी काय तुम्ही काय केलं, असा सवालही भास्कर जाधवांनी केला. बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्याचा आव आणायचा
advertisement
हे बामदास कदम, महिलांना नाचवून त्याच्यावर कमाई करणाऱ्यांना भXXXXX म्हणतात, अशा लोकांकडून दुसरी काही अपेक्षा नसल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले.
Video: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
जाधव यांनी पुढे म्हटले की, रामदास कदम हे शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना कोणतीही मोठी जबाबदारी सोपवली नाही. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी त्यांच्याकडून अशी वक्तव्ये सुरू आहेत. नारायण राणे हे उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलत नाहीत, त्यांच्या ऐवजी आता रामदास कदम बोलू लागली आहेत. त्यामुळे त्यांना असं करायला कोण सांगतंय हे लक्षात घ्या, असेही जाधव यांनी म्हटले.
advertisement
इतर संबंधित बातमी:
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 03, 2025 2:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bhaskar Jadhav On Ramdas Kadam : भास्कर जाधवांची रामदास कदमांवर जहरी टीका,''बामदास कदमने भXXXX...''